Amalner

भिलाली येथील विवाहितेची साडीने गळफास घेवून आत्महत्या… मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

भिलाली येथील विवाहितेची साडीने गळफास घेवून आत्महत्या… मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील भिलाली येथील विवाहितेने साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दि. १८ रोजी घडली आहे.

पोलिस पाटील दगा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सकाळी सहा वाजेच्या सुमारास गल्लीतील रहिवाशी समाधान पाटील याने त्यांच्या घरी येवुन सांगितले की, त्याची पत्नी नामे कल्पनाबाई समाधान पाटील (वय ३०) हिने गळफास लावून घेतला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहता सदर मयत विवाहितेने राहत्या घरात साडीने गळफास लावून घेतला होता.

त्यांनतर अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर विवाहितेच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी आहे. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो.हे.काँ. भास्कर चव्हाण हे करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button