Amalner

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकन उपक्रम संपन्न..

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकन उपक्रम संपन्न..

अमळनेर ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ‘परख’ हा राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकनाचा उपक्रम राबविण्यात आला. या सर्वेक्षणासाठी शाळांची निवड मनुष्यबळ विकास मंत्रालय व एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात येते. सदर सर्वेक्षण जिल्ह्यातील निवडक 141 शाळा मधील इयत्ता 3 री,इयत्ता 6 वी , इयत्ता 9 वी चा वर्गांचा समावेश करण्यात आला आहे.

या उपक्रमा अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 6 शाळांपैकी ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्यांपैकी निवड पद्धतीने एक तुकडी निवडून त्यातील 49 विद्यार्थ्यांपैकी परीक्षेकरिता 30 विद्यार्थ्यांची परत निवड करण्यात आली व त्या 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण करिता निरीक्षक म्हणून शुभांगी योगेश पाटील व क्षेत्रीय अन्वेषक म्हणून किशोर राजधर पाटील यांनी जबाबदारी सांभाळली व शाळेचे प्राचार्य निरज विनायक चव्हाण व शाळेतील शिक्षक यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button