Maharashtra

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात जंतनाशक गोळ्यांचा शुभारंभ.

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात”जंतनाशक”  गोळ्यांचा शुभारंभ.

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात जंतनाशक गोळ्यांचा शुभारंभ.

अडावद चोपडा प्रतिनिधी
जिल्हा परिषद आरोग्य सभापती दादासाहेब दिलीप पाटील व     जिल्हा आरोग्य अधिकारी..  डॉ-पोटोडे त्याचप्रमाणे….        तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.P.P.लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली..
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत बालकांना..”राष्ट्रीय जंतनाशक” कार्यक्रमंतर्गत ग्रामीणस्तरीय”जंतनाशक” गोळ्या मोफत दिल्या जाणार असून.. या कार्यक्रमाचा शुभारंभ..दिनांक-८ ऑगस्ट २०१९ रोजी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शुभारंभ करण्यात आला.
अडावद ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच सौ.भावनाताई पंढरीनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली…
आरोग्य सभापती आबासाहेब दिलीप पाटील यांचे जेष्ठ बंधू तथा दोडे गुर्जर संस्थानचे संस्थापक अध्यक्ष..दादासाहेब चंद्रशेखर युवराज पाटील, पंचायत समिती चोपडा चे सदस्य श्रीमती-अमिनाबी तडवी, RKS चे सदस्य वजाहत अली काझी,श्री-दिनकरराव देशमुख,श्री-भैय्या साळुंखे,आदी मान्यवरांच्या हस्ते सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंतनाशक च्या गोळ्या खाऊ घालून सार्वजनिक विद्यालय अडावद येथे शुभारंभ करण्यात आला.
 मोठ्या प्रमाणात बालकांना “कुपोषण” तथा “ऍनिमिया” *चे प्रमाणात वाढ होऊ नये.. म्हणून केंद्र सरकारने..१ वर्षे ते १९ वर्षे च्या बालकांना व शाळा बाह्य मुलामुलींना.. “जंतनाशक” *गोळया  आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगांव मार्फत मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
 प्राथमिक आरोग्य केंद्र,सर्व भागातील अंगणवाडी,तसेच सर्व शासकीय व खाजगी विद्यालया मार्फत १ वर्षे ते १९ वर्षे या वयोगटातील सर्व बालकांना “जंतनाशक” ची एक गोळी मोफत तोंडा वाटे खाऊ घातली जाणार आहे.
 हि राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्याचा मुख्य हेतू हाच आहे की,लहानपणीच मुलांच्या शरीरारात मोठ्या प्रमाणात जंतांचा प्रादूरभाव होऊन मुलांची “शारीरिक” व “बौध्दिक क्षमता” कमी होऊ न देण्याचे प्रमुख कारण आहे,त्यासाठी जंतांचे औषध घेणे सोबतच वैयक्तिक स्वच्छता पाळणे हे आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांन सोबतच.. पालकवर्गाचा देखील सहभाग  असणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डाॅ.विष्णूप्रसाद दायमा यांनी दिले

अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सार्वजनिक माध्यमिक विद्यालयात जंतनाशक गोळ्यांचा शुभारंभ.

प्रसंगी.. वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णूप्रसाद दायमा,आरोग्य सहायक श्री.PS लोखंडे,श्री.PA पारधी,आरोग्य सेवक-श्री.विजय देशमुख,श्री.सुधीर चौधरी,श्री.दिनेश वाघ,श्री.जगतराव पाटील,श्री.सुधीर चौधरी, श्री.महेंद्र पाटील, श्री.धुडकू वारडे,श्री.बळवंत पुजारी,औषधनिर्माण अधिकारी श्रीमती-विजया गावित, आरोग्य सेविका-सौ.चंद्रकला चव्हाण,श्रीमती.निवेदिता शुक्ल,श्रीमती.दुधे श्रीम.उज्वला परदेशी,श्रीम-आशा धनगर,श्रीमती.रेखा ओतारी..सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग,आशा सेविका श्रीमती-रेखा पाटील उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी…    सार्वजनिक विद्यालय अडावद चे…मुख्याध्यापक-श्री.एस.एफ.पाटील सर, पर्यवेक्षक- श्री.डी.एन.पाटील सर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button