Amalner

Amalner: कलम आणि कायदा सोबत चालले तर सुव्यवस्था निर्माण होईल.. पीआय विजय शिंदे

Amalner: कलम आणि कायदा सोबत चालले तर सुव्यवस्था निर्माण होईल.. पीआय विजय शिंदे

अमळनेर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खाते आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाही. यासाठी मदत लागते ती पत्रकार बांधवांची.यासाठी बंदूक आणि लेखणी एकत्र आल्यास समाज परिवर्तन नक्कीच शक्य होईल असे मत अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पत्रकार बांधवांशी हितगुज करताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत उपस्थित होते.

ता.22 रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान, अक्षय तृतीया तसेच महिन्या अखेरीस सखाराम महाराज यात्रौत्सव असल्याने याबाबत पत्रकारांशी चर्चा केली. यात्रौउत्सवात रथ, पालखी यांची शहरातून मिरवणूक आदी बाबत नियोजन करताना मते जाणून घेतली.यात्रौत्सव काळात सर्व भाविकांची सुरक्षितता, शांतता इसंदर्भात चर्चा करण्यात आली.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले की,आधी कामाला प्राधान्य म्हणून मी जनतेची सुरक्षितता याला महत्व देतो.कुठलीही गोष्ट किंवा कारवाई करताना घाईने निर्णय घेऊन चालत नाही. एखाद्या मोठ्या गुन्हेगारावर कारवाई केली तर ती जनतेला कळणे महत्वाचे आहे. आणि तेच काम तुम्ही पत्रकार करतात यामुळे गुन्हेगारावर आपोआप कारवाई होईल या भीतीने वचक बसतो. आम्ही केलेल्या कामाची माहिती जनसामान्य पर्यंत पोहचवीण्याचे काम पत्रकार करतात. गुन्हेगार यांच्यावर यामुळे आपोआप दहशत निर्माण होते.अमळनेर तालुक्यातील पत्रकारिता मी बघितली. कुठल्याही घटनेला न्याय देण्याचे काम येथील पत्रकारितेत दिसून येते.
याप्रसंगी सूत्रसंचालन गोपनीय शाखेचे डॉ.शरद पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button