पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परप्रांतीय बांधवांना मास्कचे वाटप
सध्या देशभरात कोरोना वायरस मुळे सुरु असलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाउन मध्ये महाराष्ट्र राज्यात व्यवसाय निमित्त आलेल्या उत्तरप्रदेश , झारखंड , इत्यादी राज्यातील नागरिक सध्या आपल्या राज्यात परतत आहेत. यावेळी त्यांना प्रवासात मास्क, सॅनिटायझर इत्यादी पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. ही परिस्थिती जाणून संपूर्ण भारतात पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे निस्वार्थ कार्य करणाऱ्या, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे संस्थांपित पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संघटनेचे विविध राज्यातील पदाधिकारी लॉकडाऊन काळातही गरजूंना मदतीचा हात देत आहेत.
या अनुषंगाने संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक प्राध्यापक गणेश लेंगरे सर यांच्या मार्फत पुणे – सोलापूर महामार्गावरून उत्तरप्रदेश , झारखंड राज्य दिशेने पायी जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांना मास्क वाटप करण्यांत आले. तसेच त्यांना कोरोना रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर तसेच घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
या कोरोना च्या जागतिक महामारी मध्ये अन्न धान्य सोबतच मास्क तसेच सॅनिटायझर वाटप करणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे जनतेला संक्रमणमुक्त ठेवले जावू शकेल असे आवाहन पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थे मार्फत करण्यांत आले आहे.






