नाशिक म्हसरूळ येथे आदिवासी जागतिक दिन उत्साहात साजरा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:नाशिक शहर व म्हसरूळ येथे ‘स्वराज्य परिवाराच्या’ वतीने जागतिक आदिवासी अर्थात मूळनिवासी म्हणजेच आत्मसन्मान दिन अतिशय आनंदी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला, या प्रसंगी महापुरुषाच्या व क्रांतिवीरांच्या प्रतिमांची पूजा विविध पोलीस कर्मचारी,मनपा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंबेडकराईट पँथरऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पगारे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे ,वाल्मीक शिंदे , नवनाथ हुमन हे होते, या कार्यक्रमाप्रसंगी म्हसरूळ परिसरामध्ये कोरोनाच्या काळात ज्या मनपा कर्मचारी, अधिकारी, पोलीस अधिकारी ,कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांनी खूप मेहनतीने काम केले,त्यात प्रकाश तात्या उखाडे, सुनील परदेशी ,नितीन पगारे ,विशाल मोराडे,राजूभाऊ थोरात,दत्तात्रय शेखरे आदींचा सन्मान स्वराज्य परिवाराचे खजिनदार वाल्मीक शिंदे व नवनाथ हुमन,आकाश बकुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आंबेडकर राईट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी दिनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की आज मूळनिवासी हा प्रवाहापासून वंचित आहे तरी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शिकून संघटित करून एक सशक्त उच्चभ्रू पिढी तयार करणे गरजेचे आहे या देशात असणाऱ्या जमिनीपैकी की 15 टक्के जमीन ही आदिवासी समाजाची आहे त्यांच्या जमिनी ,जंगले, जल हे महत्त्वाचे स्रोत नष्ट झाल्यामुळे आज हा मूळ निवासी देशोधडीला लागला म्हणून या दिनाच्या निमित्ताने त्यांच्यातला आत्मसन्मान जागृत करून त्यांनी आपली लढाई लढून स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, तसेच याप्रसंगी स्वराज्य परिवाराचे प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरित्र कार भाऊसाहेब यांनीही जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की जागतिक स्तरावर’ पृथ्वी बचाव ,वसुंधरा वाचवा, हे अभियान सुरू झालं त्यावेळेला या पृथ्वीला वाचविण्यासाठी सर्वप्रथम आदिवासींनी महत्त्वाची भूमिका बजावली ,तेव्हा पासून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा ठराव होऊन युनो च्या मार्गदर्शनाने संबंध जगात हा दिन साजरा होऊ लागला, 193 देशांच्या माध्यमातून सबंध देशातील आदिवासींच्या आत्मसन्मानासाठी आणि पृथ्वी बचावासाठी आदिवासी समाजाने एकत्र येणे येणे ही काळाची गरज आहे, हा आत्मसन्मान दिवस साजरा करत असताना या मातृभूमीसाठी ज्या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रज, सावकार जमीनदार, महाजन यांच्याविरुद्ध मोठे लढे ,उठाव केले त्यांचेही स्मरण होणे आवश्यकच आहे ,तसेच आज आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सूची पाच व सहा मध्ये जमीन, जल, जंगल याचे मालक मूळनिवासी आहे, त्याचप्रमाणे वन कायदे, पेसा कायदा, अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा ,शिक्षणाविषयीचे कायदे हे यामुळे आदिवासी समाजाची प्रगती होऊ लागलेले आहे, परंतु घटनेमध्ये होणारे बदल या बदलांमुळे आदिवासी समाज पुन्हा एकदा प्रवाहातून बाहेर जातो की काय असे चित्र दिसू लागले त्यामुळे हा दिन साजरा करताना ,आपण आपला आत्मसन्मान ही महत्त्वाचा आहे ,असे प्रतिपादित केले गेले.
या कार्यक्रमाप्रसंगी नितीन पगारे ,सोमनाथ गुंबाडे, राजू भाऊ थोरात, शांताराम नेहरे,राजेंद्र पारधी ,धर्मेंद्र बागुल ,आकाश बकुरे,रामनाथ डोंगरे, गणेश गांगुर्डे ,प्रवीण थुल ,राजू बनसोडे, मनोज गायकवाड ,दत्तात्रेय शेखरे,संजय थोरात, बंडू खाडे, विनायक सूर्यवंशी ,किरण सूर्यवंशी, वसंत भुसारे, शरद बस्ते, विजय पाटोळे केशव उगले, योगेश रिंझट,माधवराव पागे,आदित्य पवार, हे समाज बांधव उपस्थित होते






