Nashik

रत्नगडची यात्रा यावर्षीपासुन २ दिवस भरणार…यात्रा कमेटी

रत्नगडची यात्रा यावर्षीपासुन २ दिवस भरणार…यात्रा कमेटी

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणुन ओळख असणाऱ्या शिंदवड येथील श्री खंडेरायाची यात्रा ६ एप्रिल २०२३ रोजी असुन यात्रे निमित्ताने अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन रत्नगड यात्रा कमेटी कडुन करण्यात आले असुन यावेळी ग्रामपंचायत शिंदवड व रत्नगड विकास समिती कडुन रत्नगड परिसरात भाविकांची व यात्रेतील दुकानदारांची गैरसोय होवु नये यासाठी अनेक कामे प्रगतीपथावर सुरु आहेत.रत्नगड ची यात्रा हि पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा मानली जाते या यात्रेत ३ ते ४ लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.शिंदवड व परिसरातील काही गावे हे जेजुरीला दर्शनाला जात नाही अशी पुर्वीपासुन परंपरा आहे तसेच श्री खंडेराया नवसाला पावणारा असुन यात्रेच्या दिवशी व इतर रविवारी अनेक भाविक हे नवस फेडत असतात,घरातील देव व देवाची काठी व अश्व श्री खंडेरायाच्या भेटीसाठी आणले जातात.यावर्षी रत्नगडची यात्रा दोन दिवस भरणार असुन यात्रेच्या पहिल्या दिवशी (६) एप्रिल गावातुन रथ मिरवणुक करुन रथ रत्नगडला आणुन बारागाड्या ओढल्या जातात यावेळी भाविक यळकोट यळकोट जय मल्हार चा जयघोष करत असतात.यावर्षी यात्रा कमेटी स्थापन केली असुन कमेटीकडुन ५ एप्रिल रोजी सायं ७ वा रत्नगड युवा महोत्सव ६ एप्रिल सकाळी श्री खंडेरायाची महापुजा व हनुमान जयंती तसेच दिवसभर अनेक धार्मिक पुजा व यात्रा उत्सव रात्री ९ वा लोकनाट्य तमाशा ७ एप्रिल सकाळी ८ वा वाघे मंडळी यांच्या हाजऱ्या व रात्री ९ ते ११ हभप विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे हरिकिर्तन रत्नगड येथे होईल.या होणाऱ्या यात्रा उत्सवास मोठ्या संख़्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच लताबाई बस्ते,उपसरपंच सोपान बस्ते,यात्रा कमेटी अध्यक्ष रंजित बस्ते,उपाध्यक्ष संजय गाडे व ग्रा. प सदस्य ,यात्रा कमेटी सदस्य,शिंदवड ग्रामस्थाकडुन देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button