Maharashtra

चांदवड देवळा विधानसभा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक तहसील कार्यालय चांदवड येथे बोलावण्यात

चांदवड देवळा विधानसभा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक तहसील कार्यालय चांदवड येथे बोलावण्यात

प्रतिनिधी सुनील घुमरे

चांदवड देवळा विधानसभा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक तहसील कार्यालय चांदवड येथे बोलावण्यात आली काल चांदवड ला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारी साठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देण्यात आले त्याचबरोबर रुग्णासोबत संबंधित नातेवाईक, मित्र यांची तपासणी करून होमकोरोन टाईन करण्यात यावे असे आदेश ही देण्यात आले, पोलीस अधिकारी यांना ही बंदोबस वाढवण्याचे आदेश यावेळी आमदार डॉ.आहेर यांनी दिले. नगररिषद व ग्रामपंचात अंतर्गत दोन ते तीन दिवसा आड फवारणी करावी. त्याचबरोबर केशरी रेशनकार्ड धारकांना ही लवकरात लवकर धान्य उपलब्ध होईल अशी माहिती दिली. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.पंकज ठाकरे यांना मास्क सुपूर्द करण्यात आले. यावेळी बैठकीसाठी प्रांताधिकारी गणेश मिसाळ, उपनागराध्यक्ष भूषण कासलीवाल, तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्याधिकारी अभिजित कदम, गटविकास अधिकारी महेश पाटील, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी सुशील शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी पंकज ठाकरे, पंचायत समिती सदस्य डॉ.नितीन गांगुर्डे, चांदवड तालूका डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रकाश शिंदे, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, डॉ.प्रसाद कापडाने, psi राठोड, नगरपरिषद इंजिनिअर चौधरी साहेब, सपकाळे साहेब, बालविकास अधिकारी चौधरी साहेब, महिला बचतगट अधिकारी बागुल साहेब अआदीसह उपस्थित होते..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button