Rawer

खावटीच्या आशेने आदिवासी अद्यापही उपाशीच-ॲड.याकुब तडवी १० महिने उलटले खावटी कागदावरच आदिवासी समाज मदतीपासून वंचितच

खावटीच्या आशेने आदिवासी अद्यापही उपाशीच-ॲड.याकुब तडवी १० महिने उलटले खावटी कागदावरच आदिवासी समाज मदतीपासून वंचितच

मुबारक तडवी रावेर

रावेर : शासन आदिवासीच्या बाबतीत गंभीर नसल्यामुळेच योजनेच्या अंमलबजावणीला १० महिन्यांचा अवधी लोटूनही लाभ मिळत नाही आदिवासी समाज बांधवांची लाभाथ्यांचे कागदपत्र अपडेट केले गेले लाभ मात्र आजपावेतो मिळालेला नाही का फक्त ही खावटी कर्ज अनुदान योजना कागदपत्रात गुंतविली जाते ?? , या योजनेचा लाभ आदिवासींपर्यंत पोहचेल का नाही??हे अधांतरीच आहे आदिवासी विकास मंत्री यांनी घोषित केलेल्या या खावटी कर्ज अनुदान योजनांचा लाभ १०महिन्यांचा कालावधी लोटला तरी त्याचा लाभ आदिवासी बांधवांना मिळालेला नाही. आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या खावटी कर्ज अनुदान योजनेच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला लाभार्थी ची कागदपत्रे मोठा गाजावाजा करत जमा करण्यात आली या खावटी योजनेद्वारे ४०००/-चार हजार रुपये रोख राष्ट्रीयकृत बँक खात्यात देण्याची घोषणा केली गेली मात्र १० महिन्यांचा कालावधी लोटला तरी लाभाथ्यांची कागदपत्र अपडेट होत आहेत ४८६ कोटी रुपयांच्या बजेटचे अनुदानाचा लाभ आदिवासींना अद्यापही मिळालेला नाही व अंमलबजावणीसंदर्भात कुठलेही निर्देश देण्यात आले नसल्याने लॉकडाऊनच्या काळात कामे बंद असल्याने खावटीची रक्कम रोख असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या आदिवासी विकासमंत्र्यांनी खावटी अनुदान रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला सुमारे वर्ष भर आदिवासीना उदर निर्वाहचा प्रश्न निर्माण झाला होता . आदिवासी कुटुंबांची उपासमार होऊ नये हा हित बघता आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास मंत्री यांनी खावटी अनुदान योजनेंतर्गत आदिवासींना मदत व धीर दिला मात्र वर्ष उजाडले . फेब्रुवारी महिनाउलटण्यात येत आहे पण आदिवासी विकास विभागाने खावटी आदिवासी कुटुंबांना ४ हजार रुपये बॅंक खात्यात जमा केले नाहीत व खावटी योजनेच्या अनुदानाच्या आशेने आदिवासी बांधव अद्यापही उपाशीच असल्याचे चित्र सध्यातरी पाहावयास मिळत आहे तरी महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभागामार्फत या खावटी कर्ज अनुदान योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना त्वरित देण्यात यावा अशी मागणी आदिवासी समाजसेवक ॲंड.याकुब तडवी व समाजातर्फे होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button