Amalner

सार्वजनिक बांधकाम विभागाला लागले भिकेचे डोहाळे….गतिरोधक आणि दुभाजक यामुळे होत आहेत अपघात

सार्वजनिक बांधकाम विभागाला लागले भिकेचे डोहाळे….गतिरोधक आणि दुभाजक यामुळे होत आहेत अपघात

कुंटे रोड वरील मनोकामना साडी सेंटर ते रुबजी नगर पर्यंत अगणित गतिरोधकांमुळे नागरिक त्रस्त

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आले आहेत. ह्या दुभजकांचा रंग उडाला असून रात्रीच्या वेळी हे दुभाजक दिसत नाही त्यामुळे अपघात होत असतात. दुभाजकाच्या पुढील व मागील बाजूस रेडियम लावणे नियमानुसार आवश्यक आहे.किंवा पांढरे पट्टे असणे आवश्यक आहे. परंतु शहरातील कोणत्याही दुभाजका वर सदर चिन्हे दिसून येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला जर परवडत नसेल तर त्यांनी तसे सांगावे म्हणजे नागरिक गांधीगिरी करून भीक लागलेल्या या विभागाला रेडियम भेट स्वरूपात देतील अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाला लागले भिकेचे डोहाळे....गतिरोधक आणि दुभाजक यामुळे होत आहेत अपघात

त्याच प्रमाणे अमळनेर शहर रस्त्यांवरील गतिरोधक आणि खड्ड्यामुळे ओळखले जाते. शहरात अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर गतिरोधक आहेत रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसत नाहीत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते आहे. कुठेही पुढे गतिरोधक आहे असे फलक नाहीत .या ठिकाणी फलक लावणे शक्य नसेल तर कमीत कमी रेडियम किंवा पांढरा पट्टा मारणे आवश्यक आहे.त्यामुळे येथे गतिरोधक आहे याची कल्पना नागरिकांना यावी ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला लागले भिकेचे डोहाळे....गतिरोधक आणि दुभाजक यामुळे होत आहेत अपघात

शहरात,मुख्य रस्त्यावर, छोट्या रस्त्यांवर किती गतिरोधक असावेत,किती उंचीचे असावेत याचे नियम आहेत परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून डोळ्यावर पट्टी बांधून सार्वजनिक बांधकाम विभाग बसले आहे. उदा कुंटे रोड वरील मनोकामना साडी सेंटर पासून ते रुबजी नगर पर्यंत अगणित गतिरोधक आहेत त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकानीं यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग कामच करत नाही असे दिसून येत आहे. जर विभागाकडे पैसा उपलब्ध नाही तर हा विभाग अस्तित्वात असणेही आवश्यक नाही.यांचे अधिकारी,कर्मचारी कुठेही कार्यरत दिसून येत नाहीत.

अमळनेर येथे सध्या अमळनेर धुळे रोड चे रस्त्याचे काम सुरू आहे. या सम्पूर्ण रस्यावर काम सुरू असल्याचे फलक, संरक्षित पट्ट्या,दुसऱ्या बाजूने जावे अशी चिन्हे ,रात्री रस्त्याचे काम सुरू आहे हे समजण्यासाठी रेडियम इ गोष्टींचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून एक काम पूर्ण करण्या अगोदरच दुसरे काम सुरू केले जाते आहे.एका ठिकाणचे सामान उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात आणि पहिल्या ठिकाणी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.

महाराष्ट्र मराठी 7 ने लावलेल्या बातमी मुळे काही ठिकाणी संरक्षक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या परंतु त्या परिपूर्ण नाहीत असे दिसून येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला जर परवडत नसेल तर त्यांनी तसे सांगावे म्हणजे नागरिक गांधीगिरी करून भीक लागलेल्या या विभागाला रेडियम भेट स्वरूपात देतील अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button