?सावधान..सरकारकडून तुमच्या खिशाला कात्री, हळूहळू बंद होतय घरघुती सिलेंडरच अनुदान
मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात प्रत्येकावरच आर्थिक संकट ओढावलं आहे. भाजीपाल्यापासून इंधनापर्यंत सगळ्याचेच भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागली जाते. अशात आता आणखी एक बाब आहे, ज्यामुळे तुम्हाला अजून एक आर्थिक फटका बसत आहे. ही बाब तुमच्या लक्षात आली नसेल पण सरकारने हळूहळू घरगुती सिलेंडरचे अनुदान बंद केलं आहे.
एकीकडे सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे तर दुसरीकडे सरकारनेही नागरिकांच्या खिशाला कात्री लावली. एप्रिल 2020 मध्ये एका घरगुती सिलेंडरसाठी नागरिक 789.50 रुपये मोजायचा, तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये अनुदान म्हणून 199.10 रुपये जमा व्हायचे. पण आता मात्र, अनुदान म्हणून फक्त 40 ते 10 पैसे खात्यावर येतात.
आता अनुदानाविषयी बोलायचं झालं तर गॅस सिलेंडरचं अनुदान हे आतंरराष्ट्रीय पातळीवरील किंमतीवरून अवलंबून असतं. अनुदान म्हणून कधी 100 तर कधी 5 रुपयेही मिळू शकतात. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती वाढल्याने अनुदान कमी झालं आहे.
आता गॅस सिलिंडर मोफत मिळणार
इंडेन, भारत आणि HP या कंपन्यांचे LPG गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची ग्राहकांकडे नामी संधी चालून आली आहे. पेटीएमने (paytm) गॅस सिलिंडरबाबत एक खास कॅशबॅकची ऑफर जारी केली आहे. सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसीडीमुळे सामान्य ग्राहकांना गॅस सिलिंडर जवळपास 700 ते 750 रुपयांना पडतो. याच कॅशबॅकच्या माध्यमातातून गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे.
पेटीएमची योजना काय?
गॅस सिलिंडर मोफत हवे असेल तर त्यासाठी ग्राहकांना पेटीएम अॅपच्या माध्यमातून गॅस बुकिंग करावे लागेल. किंवा आयव्हीआरएस (IVRS) च्या माध्यमातून गॅस बुक केल्यानंतर पेटीएमच्या माध्यमातून पैसे द्यावे लागतील. त्यानंतर पेटीएमकडून ग्राहकांना कॅशबॅक दिला जाईल. कमीतकमी 500 रुपयांपर्यंतच्या गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. ही योजना 31 जानेवारी रोजी समाप्त होईल.
एकदाच फायदा घेता येणार
पेटीएमकडून चालवली जाणारी ही योजना 31 जानेवारी रोजी समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कॅशबॅक योजनेचा एकदाच लाभ मिळेल. पेटीएम अॅपच्या मध्यमातून पहिल्यांदा गॅस बूक केल्यानंतर ही योजना आपोआप अॅक्टिव्हेट होईल. एचपी, इंडेन किंवा भारत गॅस या कंपन्यांचे गॅस बुक केल्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना एक स्क्रॅचकार्ड दिले जाईल.
हे कार्ड स्क्रॅच केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅकची रक्कम 24 तासांच्या आत जमा ग्राहकांच्या पेटीएम व्हॅलेटमध्ये जमा होईल. दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडर बुक करताना प्रत्येक स्क्रॅच कार्डची वैधता 7 दिवसांच्या आत समाप्त होईल असे पेटीएमने सांगितले आहे.






