मटण मार्केट साठी पालिकेने केला लाखोचा खर्च मात्र उत्पन्न शुन्य! शहरात मटण विक्री खुलेआम
सावदा दि. 2 9आँगस्ट २०२० मटण मार्केट साठी पालिकेने केला लाखोचा खर्च मात्र उत्पन्न शुन्य! शहरात मटण विक्री खुलेआम
प्रतिनिधि युसुफ शाह
शहरातील बकर्याची कत्तल व मटण विक्री बंद न झाल्यास कोणत्याही क्षणी नगरपालिकेसमोर न्याय मिळे पर्यंत उपोषणाला बसण्याचा इशारा इस्लामपूर भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येथील इस्लामपुरा भागात अनेक वर्षापासून अनधिकृतपणे बकर्यांची कत्तल रस्त्यावर करून मटण विक्री केली जात आहे. याठिकाणी कत्तली नंतर बकर्यांचा मल – मुत्र, रक्त तेथील गटारीतच टाकतात. यामुळे या भागात अतिशय दुर्गंधी पसरते आणि विषारी माष्या व डास मच्छरांचा उद्रेक होतो. परिणामी एकप्रकारे मोठ्या आजार उद्भव होणे नाकारता येत नाही. सध्या कोरोना महामारीचे भयानक संकटाचा कसलाही विचार न करता खुलेआम मटण विक्री केली जात आहे..
या मटण दुकानांवर बाहेर गावचे ग्राहक येतात त्यांच्यात कोणताही सोशल डिस्टन्स व मास्कचे पालन केलेले नसते. अनेक ग्राहक दारू पिऊन येतात ते भर रस्त्यावर त्यांची वाहने उभी देतात यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो. येथील दारू पिऊन आलेले ग्राहक भडगाव,आमच्या घराचे ओट्यावर किंवा पायर्यांवर मोठ्या ने बोलतात त्यांचे विकृत बोलण्याने शेजारी घरातील महिलांना व मुलांना खुप त्रास होतो. व आहे.
मटण विक्रेते ग्राहकांना आपल्या कडे बोलण्यासाठी मोठ्याने आरोळ्या मारून बोलताना घरात शांतता भंग होत असते, दारू पिऊन येणाऱ्या ग्राहकांच्या विकृत लज्जास्पद वागणूकीने विनयभंग सारख्या घटना होत असतात मात्र बदनामी पोटी तक्रार देण्यास येथील सुशिक्षित लोक धजत नाही. यासंदर्भात मटण विक्रेत्यांना समजावून सांगण्यास गेले तर ते उलट आमच्याशी भांडण करण्यास तयार होतात. व धमक्या देऊन बोलतात की, आमच्या मालकीच्या घरासमोर आमची दुकाने आहेत. तुमच्याने जे होइल ते करा असे उर्मटपणे खुनशीने बोलतात. यासंदर्भात मागे न पा ला येथील मटण दुकाने बंद करण्यासाठी निवेदन दिलेत. तोंडि सांगितले मात्र काही उपयोग आजपर्यंत झाला नाही.
भविष्यात काही अघटित घटना घडू नये म्हणून, आणि कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर येथील लोकांच्या आरोग्याचा करून नगरपालिकेने पाच वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्चून सुविधायुक्त बांधण्यात आलेले मटण मार्केट मध्ये येथील मटणाचे दुकाने स्थलांतरित करण्यात यावे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले मटण मार्केट आजपावेतो तशेच पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. पालिकेला उत्पन्न मिळत नाही. येथे मटण मार्केट स्थलांतरित झाले तर पालिकेचे उत्पन्न सुरू होईल आणि नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.
या संदर्भात जे कोणी दोषी आहेत त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा असे न झाल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्कचे पालन करीत कोणत्याही वेळी नगरपालिकेसमोर न्याय मिळे पर्यंत उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेल्या तक्रार निवेदनात केला असून निवेदनाचे प्रति संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी व मंत्रीमहोदयांना पाठविण्यात आल्या आहेत .
शहरातील बकर्याची कत्तल व मटण विक्री बंद न झाल्यास कोणत्याही क्षणी नगरपालिकेसमोर न्याय मिळे पर्यंत उपोषणाला बसण्याचा इशारा इस्लामपूर भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येथील इस्लामपुरा भागात अनेक वर्षापासून अनधिकृतपणे बकर्यांची कत्तल रस्त्यावर करून मटण विक्री केली जात आहे. याठिकाणी कत्तली नंतर बकर्यांचा मल – मुत्र, रक्त तेथील गटारीतच टाकतात. यामुळे या भागात अतिशय दुर्गंधी पसरते आणि विषारी माष्या व डास मच्छरांचा उद्रेक होतो. परिणामी एकप्रकारे मोठ्या आजार उद्भव होणे नाकारता येत नाही. सध्या कोरोना महामारीचे भयानक संकटाचा कसलाही विचार न करता खुलेआम मटण विक्री केली जात आहे..
या मटण दुकानांवर बाहेर गावचे ग्राहक येतात त्यांच्यात कोणताही सोशल डिस्टन्स व मास्कचे पालन केलेले नसते. अनेक ग्राहक दारू पिऊन येतात ते भर रस्त्यावर त्यांची वाहने उभी देतात यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो. येथील दारू पिऊन आलेले ग्राहक भडगाव,आमच्या घराचे ओट्यावर किंवा पायर्यांवर मोठ्या ने बोलतात त्यांचे विकृत बोलण्याने शेजारी घरातील महिलांना व मुलांना खुप त्रास होतो. व आहे. मटण विक्रेते ग्राहकांना आपल्या कडे बोलण्यासाठी मोठ्याने आरोळ्या मारून बोलताना घरात शांतता भंग होत असते, दारू पिऊन येणाऱ्या ग्राहकांच्या विकृत लज्जास्पद वागणूकीने विनयभंग सारख्या घटना होत असतात मात्र बदनामी पोटी तक्रार देण्यास येथील सुशिक्षित लोक धजत नाही. यासंदर्भात मटण विक्रेत्यांना समजावून सांगण्यास गेले तर ते उलट आमच्याशी भांडण करण्यास तयार होतात. व धमक्या देऊन बोलतात की, आमच्या मालकीच्या घरासमोर आमची दुकाने आहेत. तुमच्याने जे होइल ते करा असे उर्मटपणे खुनशीने बोलतात. यासंदर्भात मागे न पा ला येथील मटण दुकाने बंद करण्यासाठी निवेदन दिलेत. तोंडि सांगितले मात्र काही उपयोग आजपर्यंत झाला नाही.
भविष्यात काही अघटित घटना घडू नये म्हणून, आणि कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर येथील लोकांच्या आरोग्याचा करून नगरपालिकेने पाच वर्षांपूर्वीच लाखो रुपये खर्चून सुविधायुक्त बांधण्यात आलेले मटण मार्केट मध्ये येथील मटणाचे दुकाने स्थलांतरित करण्यात यावे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले मटण मार्केट आजपावेतो तशेच पडून आहेत. त्यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. पालिकेला उत्पन्न मिळत नाही. येथे मटण मार्केट स्थलांतरित झाले तर पालिकेचे उत्पन्न सुरू होईल आणि नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.
या संदर्भात जे कोणी दोषी आहेत त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा असे न झाल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्कचे पालन करीत कोणत्याही वेळी नगरपालिकेसमोर न्याय मिळे पर्यंत उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेल्या तक्रार निवेदनात केला असून निवेदनाचे प्रति सर्व वरिष्ठ अधिकारी व मंत्रीमहोदयांना पाठविण्यात आल्या आहेत .