Amalner

?️अमळनेर कट्टा…बापरे..!मंदिरातील घंटा देखील चोरट्यांना पुरेना..!तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ..!

?️अमळनेर कट्टा…बापरे..!मंदिरातील घंटा देखील चोरट्यांना पुरेना..!तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ..!

पातोंडा ता अमळनेर येथील तिर्थक्षेत्र श्री माहिजी देवी मंदिरातील घंटा चोरीस गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरांना आता मंदिरातील घंटा देखील कमी पडू लागल्या आहेत. असेही तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले असून रोज कुठे न कुठे चोरीची घटना घडत आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की दि.२२ रोजी सकाळी मंदिराचे पुजारी आर.टी.गालापुरे हे नेहमी प्रमाणे मंदिरात देवीची नित्य पुजा-अर्चा व आरती करण्यासाठी आले.त्यावेळी त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना कळविले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराला लावलेल्या लोखंडी चॅनल चे कुलूप तोडून देवी मंदिराच्या गाभाऱ्यामधील बावीस किलो वजनाचा मोठा पितळी घंटा,तांब्याचे फुलपात्र,पितळी पंचारती,कुलूप इ तांब्या पितळ्याच्या वस्तू चोरून नेल्या.सदर वस्तूंची अंदाजे किंमत पंधरा ते वीस हजार रु आहे. चोरट्यांना मौल्यवान दागदागिने न मिळाल्याने शेवटी त्यांनी घंटाच लंपास केला.

गावातील लोकमान्य टिळक मित्र मंडळाने तीन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून पितळी घंटा मंदिरास सप्रेम भेट दिला होता. त्यावर मंदिराचे नावही कोरून टाकले आहे.या अगोदर दोन वेळा मंदिर व परिसरात चोरी झाली आहे. त्यावेळी देवीचा मुकुट ,पैसे व तांब्याच्या वस्तू सह आदी साहित्याची चोरी झाली होती. या घटने बाबतची माहिती ट्रस्टचे सचिव भूषण बिरारी यांनी पोलिसांना कळविली. गावात अशा अनेक लहान- मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. अद्याप एकाही चोरीचा तपास लागला नाही. सद्यस्थितीत तर गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी व पोलिसांनी रात्रीची गस्ती करावी अशी मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button