Rawer

खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीच्या लेकी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीच्या लेकी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

रावेर विलास ताठे

खान्देश माळी महासंघातर्फे तालुका व परिसरातील सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या सावित्रीच्या लेकी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला सावित्रीबाई फुले नगरात दिनांक ४ जानेवारी शनीवार रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम होईल यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी समाजप्रबोधनासाठी अनुराधा मुकेश कोकणी ( नवापूर )यांचे जाहीर व्याख्यान *वडिलांचे संघर्षमय जीवन* या विषयावर होईल मुख्याध्यापिका सौ रेखा रविंद्र जोशी ( मुंजलवाडी ), सरपंच सौ शारदा सुनील पाटील ( वाघोड ) उपशिक्षिका सौ कल्पना दिलीप पाटील (निंबोल ), नगरसेविका सौ संगीता भास्कर महाजन (रावेर ) अंगणवाडी सेविका व सचिव फुले,शाहू,आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,रावेर सौ संगीता राजेंद्र अटकाळे (रावेर ) या पाच महिलांना पुरस्कार जाहीर झाला आहे या तरी कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष शकुंतला महाजन, मार्गदर्शक कांतीलाल, महाजन, तालुकाध्यक्ष पिंटू महाजन युवा अध्यक्ष प्रकाश महाजन यांच्यासह खानदेशी माळी महासंघ तर्फे करण्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button