Kolhapur

आम्ही भारतीयने अस्मिताच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

आम्ही भारतीयने अस्मिताच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा येथील सहावीत शिकणाऱ्या अस्मिता राजेश गोळंगेला आम्ही भारतीय परिवार द्वारा माणुसकीचा हात देत शैक्षणिक साहित्य व गणवेश प्रदान करण्यात आले. शासकीय आदेशान्वये २७ जानेवारीपासून ६ वी ते ८ वीची शाळा सुरू झाली. मुले शाळेत जाऊ लागली. पण कोरोनाने साऱ्यांचे कंबरडे मोडले. ग्रामीण भागातील पालकांची अवस्था तर फारच बिकट झाली. त्यामुळे अनेक मुलांकडे शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. अस्मिता सुध्दा त्यातलीच एक. मोलमजुरी करणाऱ्या मायबापाची निरागस लेक. ती शिकण्यासाठी नेऊरवाडा येथून दररोज नवेगाव खैरीला सायकलने येते पण पायात शूज नाही, गणवेश नाही अशी अवस्था.
शाळेतील काही विद्यार्थिनींनी आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांचेशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. आकाशझेप फाऊंडेशन मागील पाच वर्षांपासून जनसामान्यांच्या सेवेसाठी निःस्वार्थ हेतूने कार्य करीत आहे. त्यामुळे कडबे यांनी लगेच अस्मिताची भेट घेऊन कार्यवाही सुरू केली. आम्ही भारतीय अभियान अंतर्गत मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्याला सातत्याने सहकार्य करणारे रामटेक येथील राकेश मेन्सवेअर व तारा एम्पोरियम तर्फे दोन गणवेश, ओम साईराम बूट हाऊस तर्फे स्कूल शूज आकाशझेप तर्फे स्वेटर, वहीपेन असे शैक्षणिक साहित्य दि.६ फेब्रुवारीला नवेगाव खैरी येथे आकाशझेपचे कोषाध्यक्ष दिलीप पवार, संचालक महादेवराव धार्मिक यांचे हस्ते प्रदान करून अस्मिताच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलवले. या सत्कार्यासाठी रामटेकचे नगरसेवक सुमित कोठारी, रमेशराव कोठारी, गजेंद्र तांदुळकर, आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दूनेदार यांचे मोलाचे योगदान लाभले. साक्षोधन कडबे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button