सिडको नाशिकचा एक कर्मचारी महिनाभरापासून गैरहजर,नागरिक हैराण,
उदय वायकोळे नाशिक
आज दि 15 डिसेंबर 2021 रोजी आमचे प्रतिनिधी उदय वायकोळे सिडको नाशिक कार्यालयात कामानिमित्त गेले असताना तेथे नागरिकांची गर्दी दिसून आली.त्याबाबत सविस्तर माहिती घेतली असता कळते की सिडको नाशिक कार्यालयातील खान नामक व्यक्ती 1 महिन्यापासून कार्यालयात गैरहजर असल्याने अनेक फाईल प्रलंबित आहेत,नागरिक प्रशासनावर रोष व्यक्त करीत होते.
याबाबत सिडको नाशिक प्रशासक बोधले मॅडम यांचेशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की गैरहजर कर्मचाऱ्यांची कॅबिन सील पंचनामा करण्यात आला आहे.नेमक्या कोणत्या फाईल त्यात होत्या व प्रलंबित कोणत्या आहेत हे लवकरच स्पष्ट करून नागरिकांची कामे तातडीने निकाली काढू.तसेच काही अनधिकृत कामे नागरिक घेऊन येत आहेत ती कशी अधिकृत होणार?असेही प्रशासक म्हणाले.






