अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोशल डिस्टन्स चा अभाव
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपूर्ण तालुक्यातील जनतेची विविध कामांसाठी गर्दी होत आहे.याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोणतेही नियम पाळण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे रेशन समस्या,बाहेरगावी जाण्यासाठी लागणारे पास, पेट्रोल पास, शेतकऱ्यांना लागणारे पास, आरोग्य पास इ साठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. या अनुषंगाने पाहीजे तशी सुरक्षितता उपविभागीय कार्यालयात दिसून येत नाही. सोशल डिस्टन्सिंग चा अभाव आढळून आला आहे.
स्वतः अधिकारी च नियमांचे पालन करत नसल्याचे अनेक उदा ठोस प्रहार ने वारंवार प्रसिद्ध केले आहे. आणि अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करावे असेही वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. कारण अधिकारी च नियमांचे पालन करत नसतील तर सामान्य जनता देखील कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही.






