Maharashtra

संयम ठेवा दक्षता घ्या श्रीमंत शाहू महाराज

संयम ठेवा दक्षता घ्या श्रीमंत शाहू महाराज

प्रतिनिधी तुकाराम पाटील

कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात आहे, तो पुढच्या टप्प्यात जाणार नाही. यासाठी आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. थोडा संयम बाळगा, घराबाहेर पडू नका, प्रशासनाला कार्य करा या परिस्थितीतून आपण लवकरच बाहेर पडू अशी आशा व खात्री आहे. जाहीर आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, कोरोना साथीच्या संदर्भात यापूर्वी आपण जनतेला उद्देशून आवाहन केले होते. पण अद्यापही साथ म्हणावं तितकी आटोक्यात आलेली नाही. आपल्या देशात कोरणा रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि यातील सर्वाधिक संख्या आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणून महाराष्ट्राने सर्वाधिक काळजी घ्यायला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरीने खंबीर पावले उचलत आहे. पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवेतील सर्व डॉक्टर, आरोग्य सेविका व वैद्यकीय क्षेत्रातील इतर कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. या सर्वांबद्दल आपल्या ठिकाणी कृतज्ञतेची भावना आहेतच, पण एवढ्याने भागणार नाही. आपण सर्वांनी आपल्या परीने कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडता, सहकार्य करायला हवे तेव्हाच त्यांच्यावरील भार व ताण कमी होईल. अत्यावश्यक कामा शिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, अशी विनंती आमच्या सर्व बंधू भगिनींना आहे. आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button