Nashik

विनायक महाराज नांदगाव तालुक्यातील वारकरी बांधवाचे प्रश्न सोडवतील -आ. श्री.सुहास कांदे यांचे प्रतिपादन

विनायक महाराज नांदगाव तालुक्यातील वारकरी बांधवाचे प्रश्न सोडवतील -आ. श्री.सुहास कांदे यांचे प्रतिपादन

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-: नांदगाव तालुक्यातील हभपश्री विनायक महाराज हेंबाडे लोहशिंगवेकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नांदगाव तालुकाध्यक्षपदी केलेली निवड ही योग्यच आहे,हभपश्री विनायक महाराज हेंबाडे वारकरी प्रश्नाचा अभ्यास करुन नक्की सोडवणुक करतील,नांदगाव तालुक्यातील वारकरी भाविकांना त्यांचे कार्य करण्यासाठी वारकरी भवन लवकरच मंजुर करु असे आश्वासनही आमदार श्री. सुहास आण्णा कांदे यांनी हभपश्री अवचितानंद महाराज व हभपश्री विनायक महाराज व हभपश्री नंदु महाराज यांचा सत्कार व अभिनंदन करतांना व्यक्त केले.

यावेळी अ.भा.वारकरी मंडळाचे जिल्हासदश्य हभपश्री अवचितानंद महाराज व हभपश्री नंदु महाराज खादगांव यांचा ही सत्कार आमदार .श्री.सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते करण्यात आला.जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर,जिल्हासदशस्य हभपश्री भाऊराव महाराज जोंधळवाडीकर, तालुका सचिव हभपश्री गुलाब महाराज सोयगांवकर, जिल्हासदस्य हभपश्री सुदाम महाराज पाटील, हभपश्री रमन वायभासे, यांनीही न्यूतन कार्यकारीणीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button