Amalner

Amalner: हातात तलवार…घोडा… डीजे… आणि नवरदेव..!

Amalner: हातात तलवार…घोडा… डीजे… आणि नवरदेव..!

अमळनेर लग्नात तलवार घेवून नाचणे नवरदेवाच्या अंगाशी आले असून वरातीत डीजेवर चिथावणी देणारे गाणे लावत तलवारीसह नाचणाऱ्या नवरदेव, डीजे मालक व इतर दोघांवर शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन लोकांना अटक केली असून नवरदेव अटकेत नाही.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, दि 16 मे दुपारी अडीच वाजता भोईवाडा भागातील कोळी समाजातील लग्नाची मिरवणूक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कसाली मोहल्यातून जात असताना चामुंडा डीजे चालक यशवंत शांताराम शिंगाणे (वय २७) याने मंदिर वही बनायेगे, हर घर भगवा आयेगा, जय श्रीराम अशा घोषणा असलेले गाणे डिजे वर लावले आणि भान विसरून नवरदेव विकी गोपाल कोळी (वय २५) हा तलवार घेऊन खाली उतरला आणि नाचू लागला. लागलीच किरण गोपाल कोळी (वय २४ रा. भोई वाडा) व त्यांचा साथीदार विकी भाऊलाल कोळी (वय २७, रा मांजरोद ता शिरपूर) हे दोघे देखील तलवार घेऊन नाचू लागले. ते या माध्यमातून दुसऱ्या गटाला चिथावणी देत होते. तेथे बंदोबस्तावर असलेले पोलीस जितेंद्र निकुंभे व होमगार्ड रवींद्र पाटील यांनी त्यांना हा प्रकार पाहून थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच डीजे चालकाला देखील गाणे बंद करण्यास सांगितले. मात्र कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून निकुंभे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले असता पोलिस निरीक्षक विजय शिंदे, दीपक माळी, शरद पाटील, मिलिंद भामरे, शेखर साळुंखे, गणेश पाटील या पोलिसांनी घटनास्थळी हजर झाले.

सदर भाग परिसर हा गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे घटनांमुळे संवेदनशील झाला आहे.अश्या प्रकारच्या दोन गटातील मतभेदाच्या घटना ह्या भागात झाल्या आहेत.अश्या परिस्थितीत तलवार घेवून चिथावणी देणे भावना दुखावल्या जातील असे हावभाव घोषणा करणे हे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकात उमटत आहेत.पो कॉ निकुंभे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून डीजे चालक, नवरदेव व इतर दोघे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button