जानोरी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : यावर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भाव नंतर आगळावेगळा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी मान्यवर
डॉक्टर अतुल वडगावकर डॉक्टर सागर मोरे डॉक्टर कासलीवाल डॉक्टर निकम डॉक्टर ख रडे डॉक्टर मौले डॉक्टर गुरव डॉक्टर भामरे आरोग्य विभागाच्या चौधरी भवर आशा अंगणवाडी आरोग्य विभाग कर्मचारी वर्ग तसेच पत्रकार विविध मान्यवर उपस्थित होते सर्वांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे वेळी प्रजासत्ताक दिनाच्या dr अतुल वडगावकर गणेश तिडके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या . भाषणातुन प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले व मोठ्या कष्टातुन मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ग्रामविकास अधिकारी के के पवार यांनी व मान्यवरांनी सांगितले .
याप्रसंगी सरस्वती व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण ग्राम पंचायत सरपंच संगीता सरनाईक जिप शाळा उपसरपंच गणेश तिडके महात्मा फुले वि शंकरराव काठे सोसायटी पांडुरंग गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन यांनी केले .व संविधानाचे महत्व विशद केले .
कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या शालेय समितीचे पदाधिकारी, तलाठी किरण भोये पो पाटील घुमरे पंचक्रोशीतील नागरीक, पत्रकार, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, देणगीदार, ग्रामस्थ , हाडस सर महात्मा फुले विद्यालय तर जिप चे मुख्या द्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर वाघ यांनी केले व मनोगत आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी के के पवार यांनी केले.






