प्रताप चे प्रताप प्रकरण…विद्यार्थ्यांचे आत्मदहन..खा शि(खादाड शिक्षण संस्था)चे संचालक मंडळ उठले विद्यार्थ्यांच्या जीवावर..शेठ मंडळ “डुलत-डुलत” पोहचले 2 तासांनी…
अमळनेर येथील खा शि चे प्रताप महाविद्यालयाच्या प्रतापांची चर्चा आणि प्रकरण सध्या जोरात आहे.विद्यार्थ्यांना नापास केल्या प्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका महाविद्यालय व संचालक मंडळाकडुन घेण्यात आली नाही. परिणामी आज महाविद्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दि 10 ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.48 तासात जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असे स्पष्टपणे पत्रात म्हटले होते. परंतु विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांच्या जीवावर उठलेल्या महाविद्यालय प्रशासन व संचालक मंडळाला काडी मात्र फरक पडला नाही. कोणत्याही स्वरूपाची चर्चा किंवा सकारात्मक उत्तर गेल्या दोन दिवसात देण्यात आले नाही व विद्यार्थ्यांना आत्मदहना पासून परावृत्त करण्यासाठी कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. परिणामी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात अंगावर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच आवरत हा विषय थोड्या वेळा साठी थांबला.यावेळी लेखी आश्वासन देण्यात आले असून
आमचे प्रताप महाविद्यालयात सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित झालेल्या टी.वाय.बी.एस्सी, (रसायनशास्त्र) वर्गाच्या विद्यापीठाच्या लागलेल्या निकालानुसार विद्यार्थी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाले व
अनुपस्थित असल्याचे दिसून आले. सदर निकालाबाबत महाविद्यालयाने सविस्तर अहवाल विद्यापीठास सादर केलेला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या मा प्र-कुलगुरू साो, यांचेशी संपर्क साधला असता सदर निकालाबाबत विधार्थी हिताचा
विचार करून सात दिवसात योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले. विद्यापीठाच्या निर्णयानुसार महाविद्यालय त्वरीत कार्यवाही करेल.
सदर निकालाच्या मूल्यमापनात संबंधित प्राध्यापकांकडून अनावधानाने काही चुका झाल्या आहेत असे आम्हास कळले व त्यानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस देत आहोत. या विषयासबंधी महाविद्यालयाकडून चौकशी समिती नेमण्यात
येणार असून सदर समितीमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधी-2, विद्यापीठाचे प्रतिनिधी-1, शासनाचे प्रतिनिधी-2, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी-2 सदस्य असे स्वरूप असेल.तर ह्या सात दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास संचालक मंडळ व प्राचार्य यांची गाढवावरून धिंड काढण्यात येईल असे भूषण भदाणे सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी सांगितले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटिल,शहर अध्यक्ष सुनिल शिंपी अनिरुध्द सिसोदे,गौरव पाटिल,सागर राजपूत,भुषण पाटिल,दिव्या बडगुजर,सागर राजपूत,सोपान पाटिल इ उपस्थित होते.
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे खा शि चे निगरगठ्ठ संचालक “शेठ मंडळ” पूर्वसूचना दिलेली असतानाही देखील ह्या सर्व घटने नंतर 2 तासांनी घटनास्थळी “डुलत डुलत” उपस्थित झाले.विशेष म्हणजे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.महाराष्ट्रात सरकार राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित आहे तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी विंग ला मोठा लढा द्यावा लागत आहे.यातून विद्यमान आमदार यांची नेमकी किती पोच व शब्दाला किंमत आहे हे स्पष्ट पणे दिसत आहे.






