Paranda

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेवगा बियाणांचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेवगा बियाणांचे वाटप

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने मधील लाभार्थींना गटविकास आधिकारी रावसाहेब चकोर यांच्या मार्गदर्शना खाली दि. २४ जुन रोजी शेवगा बियाणे वाटप पंचायत समिती सदस्य गुलाबराव शिंदे , यांच्या हस्ते करण्यात आले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत फळबाग लागवड करण्या साठी पंचायत समीतीच्या कृषी विभागा कडून प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्यात आले या योजनेत अंबा , चिक्कु फळबागे सह सुधारीत शेवगा लागवड करण्यात येणार आहे .

या वेळी राठोड आर. ए. कृषी अधिकारी , वैराळ व्ही. आर विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती परंडा व सर्व लाभार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button