Nashik

स्पंदन’ ग्रुप तर्फे लैंगिकता शिक्षण विषयावरील शिबीर उत्साहात संपन्न.

स्पंदन’ ग्रुप तर्फे लैंगिकता शिक्षण विषयावरील शिबीर उत्साहात संपन्न

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-, 1 सप्टेंबर 2022 रोजी एस एम जी एस इंग्लिश मीडियम स्कूल – नाशिक
येथे स्पंदन ग्रुप तर्फे ‘लैंगिकता शिक्षण’ या विषयावर शिबीर घेण्यात आले. यावेळी १0 ते१५ वयोगटातील सुमारे 195 मुले-मुलींना ‘वयात येताना होणारे शारीरिक, मानसिक बदल, मासिक पाळी, प्रजनन संस्था, माध्यमांचा योग्य वापर, मैत्री-आकर्षण-प्रेम या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मुलांच्या व मुलींच्या मनात लैगिंकते बद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असतात परंतु ते कुणाशी मनमोकळ्या पणाने शेअर नाही करत त्यामुळे त्यांच्यावर होत असलेले लैंगिक अत्याचार, तसेच शारीरिक अत्याचार याबाबत त्यांना कुणाशी बोलावे कुणाला प्रॉब्लेम सांगावे हे ह्या वयात उमजत नाही,
त्यासाठी ह्या संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,
यावेळी मानसशास्त्रज्ञ व स्तंभलेखिका मेघा मनोहर, डॉ.अनुपमा मराठे, डॉ.मंजुषा व्यवहारे, सुनील खरे, मालिका कलाकार रविराज वरखेडे, योग शिक्षक, काऊन्सलर श्रद्धा शिंदे यांनी मुलांशी सुसंवाद साधला.
शारीरिक रचना, मासिक पाळी याविषयी असणारे कुतूहल यावेळी मुलांनी व्यक्त केले. मुलांना अगदी सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने उदाहरणं देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले गेले. लहान मुलांमध्ये असणारी लैंगिकतेबद्दलची भीड यावेळी चेपलेली दिसली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे शिबीर संपन्न झाले.
यावेळी मुलांनी व मुलींनी आपल्या मनातील प्रश्न व समस्या यावेळी मांडल्या,
वयात येण्याच्या काळात मुलांच्या मनात काही प्रश्नांना घेऊन युद्ध सुरू असते. चलबिचलता येत असते. त्यांना स्वतःत घडणारे बदल जाणवत असतात पण ते चांगले की वाईट या द्वंद्वातच ही मुले अडकून बसतात. आजच्या शिबिरातून त्यांच्या मन-मेंदूतून ही भीती नाहीशी होण्यास या शिबिराद्वारे सुरुवात झाली.
यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल अनुराधा जगताप, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button