Maharashtra

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची पाळत.

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची पाळत.
अमळनेर 
मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळ पासूनच पाडळसरे धरण समितीच्या कार्यालयावर पोलिसांचा ससेमिरा लावण्यात आलेला होता.मुख्यमंत्री यांच्या मागिल दौऱ्यात जनआंदोलन  समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेली निदर्शने लक्षात घेता पोलिसांनी  यावेळी मोठी दक्षता बाळगली होती.
               समितीचे सुभाष चौधरी हे हेडावे चौफुली वर समितीचे कार्यकर्ते रणजित शिंदे ,सतीश काटे ,प्रशांत भदाणे यांचे सह आलेले असता पोलिसांनी त्यानां “काही निवेदन देणे,आंदोलन वैगेरे तर करत नाही ना ? अशी विचारपूस केली.तर समितीच्या वतीने शासनाने धरणासाठी १५०० कोटी रुपये कर्ज घेण्यास दिलेल्या मंजुरी साठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांचे आभार मानायचे आहे यासाठी आम्ही येथे पुष्पगुच्छ घेऊन उपस्थित आहोत असे सांगितले.मात्र तरीही पोलिसानी जास्तीचे पोलीस हेडावे चौफुलिवर बोलावून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यांचे आगमन होताच समितीचे पदाधिकारी यांनी खरच ना.फडणवीस यांची केवळ आभार मानल्याचे लक्षात येताच  अखेर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button