sawada

अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने सावदा येथे संपन्न झाला विवाह!

अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने सावदा येथे संपन्न झाला विवाह!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे शेखपुरा भागात रहिवासी वधुच्या व बुऱ्हानपूर(मध्य प्रदेश)येथील वरांच्या मंडळीने एकमेकांच्या सहमतीने मोजक्या सुज्ञ नागरिकांच्या उपस्थितीत “थाट”या शब्दास शुन्यच्या श्रेणीत टाकून थेट लग्न सारखा कार्यक्रमास इतरांनी बोध घ्यावा,अशा अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने लग्न पार पाडून,सामाजाला एक विशिष्ट प्रकारचा आरसा दाखविण्याचा कौतुकास्पद कार्य सदर लग्नाच्या निमित्ताने केला.याठिकाणी जेवण एैवजी फक्त शितपेयची व्यवस्था होती.तरी खरोखरच या विवाह सोहळ्यास एक आदर्श विवाह झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की,सावदा शहराचे तसेच मुक्ताईनगर रोडावर एका खानावळ हॉटेलमध्ये काम करणारे शेख मुश्ताक शेख इक्बाल यांची सुकन्या अल्फिया बी सोबत बुऱ्हानपूर येथील रहिवासी शेख सलीम भाई यांचे पुत्र शेख जफर यांचा लग्न अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने वर वधुच्या मंडळी आपसात ठरल्याप्रमाणे योगायोगाने महाराष्ट्र दिवस असून आज दि.१ मे २०२३ रोजी सकाळी ११-वाजता सावदा येथील शेखपुरा भागात न वाजा गाजा न मोठा लग्न मंडप न डेकोरेशन अशा प्रकारे थाट व देखावे न करता इस्लाम धर्मचे प्रेषित मुहम्मद पैगंबर सं.अ.यांनी लग्न करणे संदर्भात सर्वांना अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने करावे.जेणेकरून गोरगरिबांना लग्नकार्यपद्धती अवघड जाऊ नये,१४०० वर्षापूर्वी संपूर्ण जगाला दिलेली अशी अतिशय चांगली व सुंदर शिकवणीचे अनुकरण करून वधू व वरांकडील मंडळींनी सदरील आदर्श विवाह सोहळा संपन्न केला.तरी या लग्न सोहळ्यापासून समाजातील सर्व घटकांनी व तरूणांनी बोध घेणे गरजेचे असून यापुढे लग्न(शादी)या नावाला जोडलेल्या अधीक खर्चीक व गैरवाजवी बाबींना सर्वांनी बगल देऊन शादीला साधी असे म्हटले जावे असे आदर्श पावूल उचलावे असे मार्गदर्शन यावेळी शिक्षक अस्लम खान गुलाम गौसखान यांनी केले.याप्रसंगी वधूचे वडील शेख मुश्ताक,वरांचे वडील शेख सलीम भाई,शिक्षक अस्लम खान,शिक्षक कमालोद्दीन,समाजसेवक शेर खान,शहीद अब्दुल हमीद संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार,उपाध्यक्ष फिरोज खान,इल्यास टेलर,शेख फिरोज भाई तोसवाले,हुसनोद्दीन दादा सह वर वधू या दोघांचे घरातील ठराविक महिला व पुरुष उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button