Usmanabad

उस्मानाबाद:-जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखांहून अधिक इ पासचे वाटप,नायब तहसीलदार राजकुमार माने व टीमचे कौतुकास्पद कार्य

उस्मानाबाद:-जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाखांहून अधिक इ पासचे वाटप,नायब तहसीलदार राजकुमार माने व टीमचे कौतुकास्पद कार्य

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

उस्मानाबाद:-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहेत. त्यामध्ये जिल्हाबंदी तसेच प्रवासासाठी ऑनलाइन ई पासची सुविधा केली आहे.

त्यासाठी नागरिकांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रवासाची परवानगी देण्याचे पत्र (पास) वितरित केले जात आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना सहायता कक्षात कर्तव्यावर असणारे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील तहसीलदार राजकुमार माने आणि त्यांची टीम यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गरजवंताना पास देऊन आपली कामगिरी योग्य प्रकारे बजावली आहे..

कळंब शहरातील युनुस शेख या व्यक्तिस हृदयविकार चा तिव्र झटका आला होता त्यांनतर चालक जमीर शेख यांनी सदरील व्यक्तीला सोलापूर येथे हलविण्यात येण्यासाठी इ पास ची गरज आहे हे लक्षात घेता चालक जमीर शेख यांनी तत्काळ महसुल विभाग तहसीलदार राजकुमार माने व टीम शी संपर्क साधून इ पास अवघ्या 10 मिनिटात हस्तगत करून त्या रुग्णाचे प्राण वाचविले यासाठी राजकुमार माने व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले जात आहे..

राजकुमार माने तसेच पंकज भागवत मंदाडे नायब तहसीलदार आणि माधव मैदपवाड करमणूक कर निरीक्षक तथा जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना जिल्हा उस्मानाबाद व त्यांच्या टीमने चालक जमीर शेख कळंब यांनी संपर्क केला असता तात्काळ कोरोना सहायता कक्ष ई पास उस्मानाबाद येथे संपर्क केला तर तिथुन त्यांना अवघ्या काही मिनिटांत पास देऊ केला.तर यामुळे शेख यांना नवजीवन मिळण्यात तहसीलदार राजकुमार माने व त्यांच्या संपूर्ण टीमचा मोलाचा हातभार लागला.

आजपर्यंत या कक्षामार्फत एकूण 101093 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर 407 अर्ज प्रलंबित ,नाकारलेले अर्ज 80843 ,मंजूर पण वैधता संपलेले अर्ज 99653 आहेत.

यामुळे अनेक गरजू नागरिक ,परराज्यातील नागरिक,रुग्ण यांना पास उपलब्ध करून सहकार्य केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button