Maharashtra

शिक्षण विभागाचे आदेश शाळांतील शिल्लक शालेय पोषण आहाराचे तांदूळ,दाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांना वाटप करावे

प्रतिनिधी :मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर

केंद्र सरकारतर्फे १४ एप्रिल पर्यंत भारतीय नागरिकांना जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने उपरोक्त काळात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून एक ही विद्यार्थी उपाशी राहु नये या उद्देशाने हे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अंगणवाडी व इयत्ता ८ पर्यंत वर्गाच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारा पासून वंचित राहूत असल्याने शाळेचे मुख्याध्यापक ,योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांदूळ, डाळी, कडधान्य यांचा शिल्लक असलेला साठा विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन करून ते धान्य वाटपाबाबत

शाळास्तरावरून वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करावी.

वस्तू वाटप करतांना कोणतीही गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांना टप्याटप्याने शाळेमध्ये बोलवण्यात यावे व सोशल डीस्टिंगशनचे नियम पाळून १ मीटरचे अंतर ठेवावे. तसेच विद्यार्थी व पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे तांदूळ, डाळी, कडधान्य हे

घरपोच देण्याचे नियोजन मुख्याध्यापक यांनी करावे.

संपूर्ण देशात जमावबंदी व संचारबंदी असल्याने जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे देखील शासनाने पत्रात नमूद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button