Amalner

लाॅकडाऊन वाढीमुळे प्रत्येक सामान्य कुटूंबाला दहा हजारांची मदत द्यावी-अमोल माळी.

लाॅकडाऊन वाढीमुळे प्रत्येक सामान्य कुटूंबाला दहा हजारांची मदत द्यावी-अमोल माळी.

योगेश पवार

अमळनेर.जि.जळगाव-

संपूर्ण देशामधे महाराष्ट्र राज्यात कोरोणाचे प्रमाण अधिक असल्याने व केंद्र सरकारच्या अगोदरच महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा संयम संपला आहे.यामधे अनेक सामान्य कुटुंब होरपळून जात असताना.कोरोणापेक्षा उपासमारी किंवा आर्थिक संकटाने सामान्य नागरिक अडचणीत सापडले असुन स्वताची व कुटुंबियांची उपजीविका भागवणे कठीण झाले आहे त्यामुळे शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य कुटुंबाला किमान दहा हजारांची मदत द्यावी अशी मागणी सामर्थ्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी यांनी केली आहे.तशा आशयाच्या मागणीचे निवेदन ई मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.
लाॅकडाऊन काळात शेतकरी,शेतमजुर,विना अनुदानित खाजगी संस्थेतील कर्मचारी,सलुन,लाॅड्री व्यावसायिक,हमाली कामगार,धुने भांडी करनार्या महिला,दुकानावर काम करणारे मजुर,वृत्तपत्र व्यावसायिक,पत्रकार, इलेक्ट्रिशियन,प्लंबर,खाजगी वाहन चालक,बांधकाम कामगार यांसारखे शेकडो व्यवसाय करणारे किंवा हातमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे आज हताश झालेले आहेत.स्वताजवळ असणारी छोटी मोठी जमापूंजी खर्चुन त्यांनी आतापर्यंत आपला उदरनिर्वाह चालविला परंतु आता सगळं संपलं व बाहेर कोणीही मदत करत नसताना जगाव तरी कस किंवा अचानक दवाखान्याची समस्या उद्भवल्यास पैसे कुठून आणायचे ह्या चिंतेने ते व्याकुळ झालेले आहेत.वाहतूक बंदमुळे ज्यांच्याजवळ बँकेत थोडीफार शिल्लक किंवा जेष्ठ व्यंक्तींना शासनामार्फत मिळणार्या योजनांचे मिळालेलं मानधन काढण्यासाठी शहरात येऊ शकत नसल्याने त्यांना इतरांपुढे हात पसरविण्याची वेळ आली आहे.म्हणुन शासनाने त्वरीत निधीची तरतुद करुन महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य कुटुंबाला किमान दहा हजारांची मदत देऊ केल्यास त्याला जगण्याला आधार मिळणार आहे.म्हणुन ह्या मागणीचा सरकारने सहानुभूतीने विचार करावा असेही अमोल माळी यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button