Pandharpur

पंढरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला बचत गटाचे कर्ज माफ करा पंढरपूर तहसीलदारांना निवेदन

पंढरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला बचत गटाचे कर्ज माफ करा पंढरपूर तहसीलदारांना निवेदन

प्रतिनिधी रफीक आत्तार

महिला बचत गटातील महिलांचे मायक्रो फायनान्स आणि बँकांकडील सर्व कर्ज माफ करणेबाबत,,महाराष्टातील लाखो माता भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून व्यवसाय साठी कर्ज घेतली आहेत, गेली 15 ते 20 वर्ष झाले हे कर्ज घेत असून ते नियमित पणे परत फेड करत आले आहेत,,
हे कर्ज घेत असताना मायक्रो फायनान्स कंपनी प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दर वर्षी विमा पॉलिसी च्या नावाखाली हजारो रुपये घेतात, परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाहीत.

साहेब,कोरोनाच्या या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत, कोणाच्याही हाताला काम नाही,उपासमारीची वेळ आली आहे, न्हवे तर भूक बळी जात आहेत, अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत,, साहेब, महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसाय च बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत,, अनेक महिलांनी कर्ज घेऊन लोणचे, शेवया, पापड, यासारखे पदार्थ तयार केले होते, परंतु लॉक डाऊन मुळे तो माल विकला गेला नाही आणि 6 महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला त्यामुळे त्या महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे, ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे,,
मायक्रो फायनान्स चे कर्मचारी रोजच त्या महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहेत, धमकी देत आहेत, घरातील साहित्य उचलून नेत आहेत, पैसे द्या नाही तर तुमचा टी व्ही ,फ्रिज, गॅस, भांडी घेऊन जातो अशी धमकी देत आहेत, महिलांना अश्लील बोलणे, शिविगाळ करणे, त्यांच्या घरात बसून राहणे, , असे मायक्रो फायनान्स चे गुंड करत आहेत.

साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील बचत गटाच्या महिलांना असा त्रास दिला जात आहे,, वास्तविक कोरोनाच्या नैसर्गिक संकटामुळे महिलांचा व्यवसाय अडचणीत आला त्यांचे भांडवल बुडाले ,जर व्यवसाय अडचणीत आला बुडाला तर विमा कवच आहे परंतु विम्याचे पैसे घेऊन देखील विमा देत नाहीत, जर विमा मिळाला तर या सर्व महिलांना दिलासा मिळेल,, मायक्रो फायनान्स कंपनीकडे वारंवार विमा सर्टिफिकेट ची मागणी करून देखील ते विमा सर्टिफिकेट देत नाहीत याचा अर्थ त्यांनी पैसे घेऊन देखील ते विमा कंपनी कडे भरले नाहीत,, म्हणजे लाखो कोटी रुपयांचा घोटाळा या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांनी केला आहे,याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

साहेब सरकारने मोठमोठ्या उद्योग पतींना कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत,, महिला बचत गटाची तर खूप छोटे कर्ज आहे ते संपूर्ण माफ होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही नम्र विनंती,, साहेब महिला खूप अडचणीत आहेत ,कसलेही काम नाही ,त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींना देखील काम नाही प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहेत ,,आणि वरून रोजच मायक्रो फायनान्स गुंडांचा त्रास यामुळे अनेक महिला निराशेचे जीवन जगत आहेत अशातच पंढरपूर येथील मनीषा निकम या महिलेने या गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे,, आशा अनेक महिला आत्महत्या करत आहेत, ,तरी कृपया मायक्रो फायनान्स कंपनीना विम्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी आदेश द्यावे आणि संपूर्ण वसुली थांबवावी ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल हा मोर्चा मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती दिलीप बापू धोत्रे सौ निकिता पवार सौ अन्मिता गायकवाड
शशिकांत पाटील सिद्धेश्वर गरड रंजना इंगोले महेश पवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button