Parola

शेळावे ता पारोळा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात .

 
शेळावे ता पारोळा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात…
राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे यांचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार उपक्रम…

शेळावे ता पारोळा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात .

 

पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी
शेळावे ता पारोळा
 शेळावे ता पारोळा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद जि.प.उच्च प्राथमिक शाळा मोहाडी व जि प प्राथमिक शाळा चिखलोद यांच्या संयुक्त विदयमानाने उत्साहात पार पडली . या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख जितेंद्र आत्माराम पवार हे होते . शाळेच्या विदयार्थीनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले . मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन, क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचे पूजन करुन परिषदेची सुरुवात करण्यात आली . केंद्र प्रमुख जितेंद्र पवार, राज्याध्यक्ष गिरीष वाणी , तालुकाध्यक्ष गुणवंतराव पाटील, ग्रेडड मुख्याध्यापिका श्रीमती रत्ना भदाणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती पाकिजा पटेल यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले . मोहाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर छान नाटिका सादर केली . सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विदयार्थ्यांना नेहमी धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे प्रत्येक शिक्षण परिषदेत शैक्षणिक साहित्य बक्षिस दयायचे  या परिषदेपासुन या पुढे आता त्यांनी ज्या शाळेवर ही परिषद राहील त्या शाळेतील एक विदयार्थी व एक विद्यार्थीनी आदर्श म्हणुन निवडायची व त्यांना शैक्षणिक साहित्य बक्षिस देवुन  प्रोत्साहन दयायचे या उपक्रमाची सुरुवात केली . या परिषदेत मोहाडी शाळेचे आवेश अब्दुल खाटिक, सुमय्या आसिफ खाटिक चिखलोद शाळेचे साक्षी चतुर पाटील, तन्मय भगवान पाटील या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श  विदयार्थी म्हणुन गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहाडी शाळेचे मुख्याध्यापक जगदिश भटु पाटील यांनी केले . दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी आदर्श परिपाठ सादर केला . श्रीमती वंदना भगवानराव  ठेंग यांनी इ ५ वी च्या वर्गाचा पर्यावरण संतुलन घटकावर आधारित ज्ञानरचनावादी उत्कृष्ट नमुना पाठ सादर केला . विदयार्थ्यांचे अवधान व प्रतिसाद उत्तम होता . नंतर त्यांनी लोक सहभागातुन शाळा विकास या विषयावर उत्तम मार्गदर्शन व अनुभव कथन केले . त्यांनी पिंगळवाडे ता अमळनेर शाळेवर पंचवीस लाख पेक्षा जास्त लोकसहभाग व शाळा अ श्रेणीत आणली आहे . चिखलोद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता भालचंद्र सुर्यवंशी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेखक संजय औटे लिखित बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड या पुस्तकाचा सुंदर परिचय करून संघर्षातुन कसे जीवन घडते याचा परिचय करून दिला . विज्ञान या विषयावर आधारित गट कार्य व अध्ययन निष्पत्ती वाचन व चर्चा यात सर्वच शिक्षक बांधवांनी सहभाग घेतला .
केंद्रप्रमुख जितेंद्र आत्माराम पवार यांनी प्लास्टिक मुक्त शाळा व राष्ट्र, शाळेत मोबाईलचा कमीत .कमी वापर, माता पालक संघ, गणवेश वाटप रजिस्टर, शाळा व्यवस्थापन समिती प्रोसिडींग, मोफत पाठ्यपुस्तक रजिस्टर शिक्षक पालक संघ या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले . 
मोहाडी शाळेचे सोमनाथ बाबुराव पाटील पदविधर शिक्षक यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन केले . चिखलोद शाळेचे उप शिक्षक राहुल रविंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले . परिषद यशस्वीतेसाठी दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेवुन छान आयोजन व नियोजन केल्याने शिक्षण परिषद गुणवत्ता वर्धन करणारी ठरली.
 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button