Pandharpur

जनतेचे सेवक असलेले सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांना वाढीव मानधन मिळणे करता” ग्रामसंवाद सरपंच संघ” प्रयत्न करणार-सतीश भुई

जनतेचे सेवक असलेले सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांना वाढीव मानधन मिळणे करता” ग्रामसंवाद सरपंच संघ” प्रयत्न करणार-सतीश भुई
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या सरपंच संघाचे प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे पाटील उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सोलापूर, सातारा, पुणे ,अहमदनगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष यांच्याशी ग्रामसंवाद सरपंच संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई यांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, खेड्याकडे चला या महात्मा गांधी यांच्या संदेशा प्रमाणे “ग्राम संवाद सरपंच संघ”हा महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या पर्यंत पोहोचत आसून सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या न्याय हक्क व अधिकार यांच्याविषयी प्रबोधन करून सामाजिक कार्य करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्या करिता “ग्राम संवाद सरपंच संघ ” महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील असेल तसेच सरपंच उपसरपंच यांना मानधन वाढवून मिळण्याकरता पाठपुरावा करणार आहे व ग्रामपंचायत सदस्य यांनासुद्धा मानधन मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहे त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी एकत्र येणे गरजेचे आहे “ग्राम संवाद सरपंच संघ ” महाराष्ट्र राज्य हा सरपंच संघ निपक्षपातीपणे एकत्र येऊन महाराष्ट्रातील एक परिवार असल्याप्रमाणे काम करत आहे असे मत सतिशदादा यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button