कळमसरे येथे आदिवासी दिनानिमित्त फलक अनावरण
अमळनेर प्रतिनिधी, गजानन पाटील
तालुक्यातील कळमसरे येथे 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.गावातील शेकडो आदिवासी बांधव तसेच महिला वर्ग एकत्रित येऊन राजपुत्र एकलव्य सेना मित्र मंडळ या नावे आदिवासी महाराष्ट्र सेना प्रमुख राज साळवी, शांताराम भिल धुळे कल्याण सभापती,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गोविंद माळी यांच्या उपस्थितीत फलक अनावरण करण्यात आले.तसेच किशोर मालचे या तरुणाची राजपुत्र एकलव्य सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी तर,महिला अध्यक्ष पदी रेखा आबा भिल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी गावातील सरपंच कल्पना पवार,ग्राम पंचायत सदस्य जितेंद्र राजपूत,माजी ग्रा.प.सदस्य रमेश चौधरी, योगेंद्रसिंग राजपूत,किसनसिंग राजपूत,तसेच एकलव्य सेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक वाद्यच्या(डी जे) तालावर गावातून भव्य मिरवणुकीने झाली.गावातून निघालेल्या शोभा यात्रेत आदिवासी चालींवर नृत्य करीत उपस्थितांच लक्ष वेधुन घेतलं.यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान याच दिवशी महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले.कुठलीही कोणाकडून आर्थिक मदत न घेता गावातील आदिवासी बांधवांनी महिनाभर मोल मजुरी करीत पैसे साठवून हा कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.








