आ शिरीष दादा चौधरी आणि पाडळसरे धरण समिती यांच्या प्रयत्नांना यश
निम्न तापी प्रकल्पाला निधी मंजूर होऊन धरणात पाणी साठण्या अगोदरच वाघ मारायची परवानगी न राहिल्यामुळे श्रेय घेण्यासाठी “बेडुक उड्या” सुरू…
अमळनेर येथील प्रलंबित असलेला निम्न तापी प्रकल्पास निधी मंजूर करून काम सुरू होण्या कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे कारण ह्या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती ला आळा बसणार असून पिण्याच्या पाण्याचा च नव्हे तर शेतकरी प्रश्न,शेतीचे उत्पन्न ,आर्थिक उलाढाल इ मध्ये परिवर्तन होणार असून तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. त्यामुळे निम्न तापी प्रकल्प हा जन सामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पाडळसरे धरण समितीने मूक मोर्चा काढत अनेक आंदोलने करत हा प्रश्न जिवंत ठेवला होता.आमदार शिरीष दादा चौधरी यांनी वारंवार मा गिरीष महाजन,मा,नितीनजी गडकरी,आणि मा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या भेटी घेऊन सदर प्रश्न उपस्थित करून निदर्शनास आणून दिला आहे. तसेच लेखी स्वरूपात वारंवार पाठपुरावाही केला आहे. अमळनेर तहसिल आवरात १९ फेब्रूवारी २०१९ला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या आंदोलनात आपण धरणाला १५०० कोटी रूपये नाबार्ड कडून मिळवून आणणार असे आश्वासन समितीच्या सदस्यांना त्या दिवशी दिले होते त्यासाठी वेळोवेळी राज्य शासनाकडे पाठपूरावा देखील केला होता
जनतेला दिलेला शब्द आज या निधीच्या मंजूरीला मंत्री मंडळ बैठकीत मंजूरी मिळाल्याने पूर्ण झाला असल्याचे आ शिरिष चौधरी यांनी म्हटले आहे त्यामूळे कोणीही फुकटचे श्रेय घेवू नये असेही त्यांनी दै देशदूतशी बोलतांना म्हटले आहे याचे खरे श्रेय मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गिरिष महाजन यांचे असून त्यांचेकडे आपण केलेला पाठपूरावा व पाडळसरे जन आंदोलन समितीने ऊभारलेले जन आंदोलनाचा रेटा कामी आला असल्याचे आ चौधरी यांनी सांगीतले
परंतु आता श्रेय घेण्या साठी “हिरवे बाजार” तत्पर झाला आहे.फक्त श्रेय घेऊन,बॅनर बाजी करून कसे काम घुंगटच्या पदरात पाडून घेता येईल एवढेच काम तत्परतेने जमते.ज्या लोक प्रतिनिधींनी,सामान्य जनतेने वारंवार निम्न तापी प्रकल्पाच्या पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न केले आहे ते बाजूलाच राहतात जंगलात वाघ मारायची हिम्मत राहिली नाही त्यामुळे आता नसलेल्या पाण्यात किंवा धरणात पाणी येण्या अगोदरच बेडूक उड्या सुरु झाल्या आहेत.








