Bollywood

ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार इंदिरा गांधी यांची भूमिका..पहा दिसते अगदी हुबेहूब…मेकअपची कमाल..

ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार इंदिरा गांधी यांची भूमिका..पहा दिसते अगदी हुबेहूब…मेकअपची कमाल..

मुंबई सध्या सोशल मीडियावर ह्या अभिनेत्री च्या लूक ची जोरात चर्चा सुरू आहे. अगदी हुबेहूब इंदिरा गांधी यांच्या सारखी दिसणारी हे अभिनेत्री आहे तरी कोण हे जाणून घेऊ या…. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाग बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षयने चित्रपटाचा ट्रेलर दिल्लीत संपूर्ण टीमसोबत लॉन्च केला आहे. प्रथमच अक्षय कुमार ऐवजी अभिनेत्री वर तिच्या लूक बद्दल तुफान चर्चा रंगली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांच लक्ष हे अभिनेत्री लारा दत्ताने वेधून घेतलं आहे. लारा दत्ताने ‘बेल बॉटम’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिची ऑनस्क्रीन ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.आणि कौतुक देखील केलं आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील लारा दत्ताच्या भूमिकेचीही स्तुती करण्यात आली आहे. लाराला या ट्रेलरमध्ये ओळखता देखील येत नाही आहे की ती एक ४६ वर्षांची स्त्री आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर लारादत्ता हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

लाराच्या लूकची चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आपली मिस युनिव्हर्स लारा दत्ताचा हा लूक अप्रतिम आहे..या चित्रपटाची वाट पाहत आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बापरे ही लारा दत्ता आहे…तिचा मेकअप पाहून ओळखता येत नाही आहे. मेकअप करणाऱ्याला पुरस्कार मिळाला पाहिजे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही लारा दत्ता आहे…ओळखूच शकलो नाही, अप्रतिम.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘जेव्हा आपण आपल्या आवडत्या मुलीला खूप वर्षांनंतर भेटतो,’ अशा अनेक कमेंट करत कोणी लाराची स्तुती केली तर कोणी लारावर मीम्स शेअर केले आहेत.

संबंधित लेख

Back to top button