Maharashtra

दौंड तालुक्यात कासुर्डीतील १७ जणांसह एकाच दिवसांत 30 कोरोनाग्रस्त

दौंड तालुक्यात कासुर्डीतील १७ जणांसह एकाच दिवसांत 30 कोरोनाग्रस्त

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे कोरोना पॉझिटिव्ह नवरा-नवरीमुळे एकाच कुटंबासह नातेवाईक मिळून तब्बल १७ जणांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वीच हे लग्न झाले होते. आज त्यातील सासरच्या कुटुंबातील लोकांच्या केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. दरम्यान या कासुर्डीतील कोरोनाग्रस्तांसह दौंड तालुक्यात आज एकाच दिवसांत २८ जण कोरोनाग्रस्त झालेत.

कासुर्डी येथील नवरदेवाचे उरळी कांचन येथील नवरी मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर नवरा-नवरीला त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सासरच्या ३४ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये निकटच्या कुटुंबातील १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले. आता १७ जणांना कोरोना झाल्याने आरोग्य खात्यातही आता त्यांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अर्थात मांडवझळयांमध्ये गावातील आणखी किती जण होते, हे आता शोधले जाईल.

दरम्यान दौंड तालुक्यात कोरोनाचा रतीब आजही सुरूच राहीला. आज एकाच दिवसांत २८ जण कोरोनाग्रस्त आढळले. यात कासुर्डी तील १७ जणांखेरीज बोरीभडक येथे ४ जणांना कोरोनाची लागण झाली. पाटस येथील कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर मुलगी, पत्नी व जावई या तिघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे खामगाव, केडगाव, वाटलूज, सहजपूर व राजेगाव येथे प्रत्येकी एक जण कोरोनाग्रस्त आढळला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button