Khirdi

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांचा समावेश करावा..

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांचा समावेश करावा..

खिर्डी/प्रतिनिधी:-भिमराव कोचुरे

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना लाभापासून अनेक शेतकरी वर्ग वंचित असल्याने लाभ मिळावा यासाठी मतदारसंघातील शेतकऱ्यांनी युवासेना रावेर ता.उपप्रमुख तुषारभाऊ कचरे यांचेकडे कैफियत मांडली..
सविस्तर वृत्त असे की ह्या वर्षी सन 2020 मध्ये चालू असलेल्या मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषी पंप योजनेचे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने मागविले जात असून सदरील योजनेतील दुव्या मध्ये जळगांव जिल्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुका हा वगळलेला असून या योजनेपासून तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावें लागत असून पिकांचे खूप मोठे नुकसान होत आहे.

तरी योजनेचा लाभ मिळाल्यास त्यापासून टळणारे नुकसान व होणारे फायदे-जसे की त्या योजनेतून शेतकऱ्यांना 95% अनुदान प्राप्त होऊन मदत होईल त्यामुळे इलेक्ट्रिक लाईट खंडित अथवा बंद जरी असल्यास सौरकृषि पंपामुळे विजेची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तसेच वीज बिला पासून मुक्तता मिळेल व डिझेल पंपाच्या तुलनेत परिचलन खर्च खूप च कमी येतो यामुळे फायदा होईल शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागणीचा तात्काळ सारासार विचार करून शेतकऱ्यांना सदरील योजनेचा लाभ घेता यावा.

या करिता रावेर-मुक्ताईनगर तालुका योजनेत समाविष्ट करावा अशी विनंती शेतकऱ्यांमार्फत युवासेना रावेर ता.उपप्रमुख तुषार कचरे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री मा.नितीनजी राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.व मागणीचा आपण लवकरात लवकर विचार करून तसेच निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना आनंदाची बातमी द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button