Maharashtra

मारवड येथील तरुण प्रफुल्ल पाटील यांनी वाढदिवसनिमित्त गावात वाटले गोरगरिबांना तेलाचे पाऊच

मारवड येथील तरुण प्रफुल्ल पाटील यांनी वाढदिवसनिमित्त गावात वाटले गोरगरिबांना तेलाचे पाऊच

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

मारवड येथील प्रफुल्ल पाटील यांनी वाढदिवसाला कुठल्याही खर्च न करता वाढदिवसाच्या खर्चात गावात गोरगरिबांना तेलाचे पाऊच वाटप केले

जगभरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. शासन व प्रशासन त्याचा युद्धपातळीवर सामना करीत लढत आहे. अशातच लाँकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडल्याने अशावेळी सामाजिक, धार्मिक संस्था पुढे येऊन गरजूंना मदतीसाठी एक हात पुढे करीत सढळ हाताने सहकार्य करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड या ग्रामीण भागातील युवा तरूण प्रफुल्ल पाटील याने आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत मारवड येथे गरीब गरजूंना तेलाचे पिशव्या वाटून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कामाचे परीसरात अभिनंदन होत आहे.

आपण पाहत आहोत संपूर्ण जगात कोरोना नें कीती थैमान घातले आहें ——–
म्हणून सर्व सन उत्सव संपूर्ण पणे बंद ठेवन्यात आलें आहे .की कुठेही गर्दी होऊ नये म्हणून काल यानिमित्ताने तरुण मित्र प्रफ्फूल पाटिल याने त्याचा वाढदिवस अत्यंत साधा पध्दतीत साजरी केला ——
व वाढदिवसाच्या सेलिब्रेशन / पार्टी वगैरे न करता त्या पैशांनें आमच्या मारवड मध्ये प्रफुल्ल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त अत्यंत सर्व सामान्य लोकांना ज्यांचे या लॉकडाऊन मुळे काम धंदे व्यवसाय बंद आहेत अश्या लोकांना स्व खर्चाने 1 किलो तेल चे पाऊच वाटले .जवळजवळ 3 हजार रुपयाचे तेलाचे पाऊच वाटून समाजात एक नविन आदर्श निर्माण केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button