Parola

जेवतांना ठसका लागल्याने 14 वर्षीय बालकाचा मृत्यु 

जेवतांना ठसका लागल्याने 14 वर्षीय बालकाचा मृत्यु

पारोळा✍(प्रतिनिधी) कमलेश चौधरी

येथील गोपाल नगर येथील 14 वर्षीय बालकाचा जेवण करतांना ठसका लागल्याने मृत्यु झाल्याची घटना दि,१८ रोजी सकाळी ११वाजून४५मिनिटाच्या सुमारास घडली.

अमोल देविदास नाईक( वय १४)रा गोपाल नगर,पारोळा हा आपल्या घरी जेवण करीत होता.परंतु जेवण करित असतांना त्यास अचानक ठसका लागला.सदर घटनेची माहीती कळताच परिसरातील नागरिकांनी त्यास उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले.परंतु अमोल ची प्रकृती गंभीर झाल्याने यावेळी वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

नंदु भावडु जाधव यांच्या खबरीवरुन पारोळा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार किशोर पाटील करित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button