Maharashtra

? परीक्षा 12 वि ची परीक्षेला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

परीक्षा 12 वि ची

परीक्षेला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.

? परीक्षा 12 वि ची परीक्षेला जाण्याआधी 'या' गोष्टींची घ्या काळजी

  • परीक्षा केंद्र

आपलं परीक्षा केंद्र कोणतं आहे, वर्ग क्रमांक कोणता आहे आणि कोणता पेपर आज आहे या सगळ्याची तपासणी करणं आवश्यक आहे. एकाच दिवशी अनेक विषयांचे पेपर असल्यानं अनेकदा गोंधळ होतो. अशावेळी परीक्षा गृहात जाण्याआधी 15 मिनिटं परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचून या सर्व गोष्टी तपासणं आवश्यक आहे. जर परीक्षा केंद्रावर काही आपल्या आसन क्रमांकाची गडबड असेल तर तातडीनं शिक्षकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

  • यूनिफॉर्म –

काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ड्रेस कोड आहेत. तर काहींना नाहीत. शाळांना मात्र यूनिफॉर्म कंपल्सरी आहे. परीक्षा केंद्रावर यूनिफॉर्ममध्ये येणं बंधनकारक आहे. यासोबत आपलं हॉल तिकीट आणि शाळेचं आयडीही सोबत असायला हवं.

  • वेळ

परीक्षेत सर्वात महत्त्वाची असते ती वेळ. बऱ्याचदा परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यानं पेपर राहिला किंवा पेपरला बसू दिलं नाही अशा तक्रारी समोर येतात. यासाठी पूर्व नियोजन करून वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचावं.

  • आहार –

परीक्षेला जाण्याआधी घरातून निघताना पोटभर खाऊन निघावं. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. भुकेमुळे पेपर लिहिण्यात अडथळे निर्माण होऊ

शकतात. हल्क आणि हेल्दी आहार घेऊन पेपरसाठी जावं

  • नियमांचं पालन करा –

परीक्षागृहातील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात येते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button