Aurangabad

? 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

? 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : ‘पप्पा मला माफ करा’, अशी चिठ्ठी लिहून पैठण तालुक्यातील पाचोड येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री समोर आली आहे. अंजली जाधव (वय-20) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अंजली जाधव ही पैठण शहरातील एका महाविद्यालयात डीएडचे शिक्षण घेत होती. गळफास घेतलेल्या अवस्थेत अंजली दिसून आल्यानंतर तिचे वडील काकासाहेब जाधव यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

यानंतर पोलीस अधिकारी, जमादार सुधाकर मोहिते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. पंचनाम्यादरम्यान, एक चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली. त्यात अंजलीने ‘माझ्या मरणासाठी कोणालाही दोष देऊ नका, पप्पा मला माफ करा’, असे लिहिलेले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शिक्षणात हुशार असलेल्या अंजलीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले असावे, अशी चर्चा सुरू आहे. आत्महत्येचे ठोस कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पाचोड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button