Satara

राजाळे तालुका फलटण येथील रूद्र बझार मध्ये २लाख ६२ हजाराची चोरी

राजाळे तालुका फलटण येथील रूद्र बझार मध्ये २लाख ६२ हजाराची चोरी

प्रतिनिधी दिलीप वाघमारे

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे या गावात मकर संक्रांतीच्या पूर्व संध्येला मध्यरात्रीच्या सुमारास रूद्र बझार मध्ये जबरी चोरी झाली असून यामध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे

फलटण तालुक्याच्या पूर्व बाजूला फलटण – आसू रस्त्यावर राजाळे या गावात तीन व्यावसायिकांनी मिळून रूद्र बझार सुरू करण्यात
आला होता. या बझार मध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बझार च्या बाजूने लावलेल्या पत्रा उचकून आत मध्ये प्रवेश करुन बझार च्या कापड विभागातील किंमती साड्या, लेडीज ड्रेस व कपडे, पैठणी, बनारसी साड्या, जिन्स, टाॅप जेन्टस शर्ट,पॅन्ट व लहान मुलांचे कपडे आदींसह कपडे चोरट्यांनी चोरुन नेहले आहेत.

राजाळे तालुका फलटण येथील रूद्र बझार मध्ये २लाख ६२ हजाराची चोरीबुधवारी सकाळी बझार उघडण्यास गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी तातडीने भेट देऊन घडलेल्या घटनांची माहिती घेतली. सातारा येथील श्वान पथकाने व ठस्से तज्ञांना तातडीने पाचारण करून सबंधीतांनी माहिती घेतली. फलटण उपविभागीय पोलीस उपनिरक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
तीन वर्षापूर्वी गोखळी येथील मच्छिंद्र धर्माधिकारी, सचिन गावडे, प्रवीण कदम या बेरोजगार युवकांनी फलटण -आसू मार्गावर राजाळे येथे रूद्र बझार उभारला आहे. मंगळवारी मध्यरात्री बझारचे पश्चिम बाजू कडून पञा उचकाटून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून २ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे बझारचे चालक मच्छिंद्र धर्माधिकारी यांनी सांगितले.

राजाळे तालुका फलटण येथील रूद्र बझार मध्ये २लाख ६२ हजाराची चोरी

यापूर्वी फलटण पूर्व भागातील गोखळी आसू पवारवाडी येथील शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. सदर घटनेचे सी.सी.टी.व्ही फूटेज पोलिसांनी तपासणी करून सुध्दा घडलेल्या घटनांचा अद्याप तपास न लागल्याने नागरीकांचे कडून पोलीस तपास यंञणेबद्दल नाराजी व्यक्त केला जात आहे. बेरोजगार युवकांनी कर्ज काढून उद्योग व्यवसाय उभारावेत तर चोरी च्या घटनांमुळे पुन्हा युवा वर्ग अडचणीत येताना दिसत आहेत. या बाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत. पोलीस यंत्रणेने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी फलटण तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button