Amalner

Amalner: जिल्हा किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी प्रा सुभाष पाटील यांची नियुक्ती..!

Amalner: जिल्हा किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी प्रा सुभाष पाटील यांची नियुक्ती..!

अमळनेर:- जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी प्रा. सुभाष सुकलाल पाटील (जिभाऊ) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून
त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

प्रा. सुभाष जिभाऊ यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी विविध प्रश्नांवर प्रशासनाशी झगडत न्याय मिळवून दिला आहे.त्यांचे संघटन देखील उत्तम असून अनेक वर्षांपासून तळागाळातील शेतकरी वर्गासाठी त्यांची लढाई सातत्याने सुरू आहे. यांच्या या कार्याची दखल घेत जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून नाशिक येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, किसान काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी पराग पास्ते, उत्तमराव
देसले यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची हातोटी असलेल्या सुभाष जिभाऊ यांचे कार्याची माहिती वरिष्ठांकडे असून भविष्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले यावेळी दिले आहेत.तालुक्यातील काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत आणि अभिनंदन केले आहे.जिल्हा पदाधिकारी सुरेश पाटील,
जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, संदीप भैय्या पाटील (चोपडा), अजबराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, शांताराम साळुंखे, मुन्ना शर्मा, मनोज पाटील (नाशिक), रवींद्र
बैसाणे (कांदिवली), भागवत गुरुजी, धनगर दला पाटील, शिरुड येथील सरपंच गोविंदा सोनवणे, उपसरपंच कल्याणी पाटील, विनोद पाटील, दीपक शिसोदे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून देखील अभिनंदन केले जात
आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button