Amalner

Amalner: कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम धूम धडाक्यात..

Amalner: कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम धूम धडाक्यात..

अमळनेर कळमसरे म्हटलं म्हणजे सर्व जातीजमातीचे एकोपा ठेवणारं गाव.. अशा गावात नावाजलेली शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय.. ह्या सुंदर शाळेत काल सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी अमळनेरचे डी. वाय.
एस. पी. राकेश जाधव प्रमुख पाहुणे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री महेंद्रलाल कोठारी होते.. सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे राकेश जाधव यांनी प्रतिमा पूजन केले. अगोदर राकेश जाधव यांचा परिचय सामाजिक कार्यकर्ते बापूराव ठाकरे यांनी करून दिला.सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष यादव चौधरी यांनी केला.. राकेश जाधव यांनी आपल्या भाषणात
पोलीस प्रशासनाची भूमिका तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी, सुरक्षेसाठी काय केले पाहिजे याबाबत सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांचा कसा विकास होतो.. नेतृत्व कसे निर्माण होते यासंदर्भात माहिती दिली.

विचारमंचावर संचालक मंडळ व शाळेच्या मुख्याध्यापिका विराजमान होत्या.सर्वप्रथम गणरायाला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विविध संस्कृतीमधील परंपरेवर आधारित गीते, देशभक्तीवरील गीते, नाटिका होत्या.. अतिशय मनोवेधक कार्यक्रम लोकांना पहायला मिळाला. गाणी व नाटिकासाठी शाळेतील शिक्षक श्री एस. एच. भवरे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख व श्री आर. जी.
राठोड यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम बसविले.गाण्यात

कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त योगेंद्र राजपूत, दिपचंद छाजेड, आदर्श सेवानिवृत्त
शिक्षक किसनसिंह राजपूत गावाचे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांनी उपस्थित होते. मान्यवरांचा परिचय मुख्याध्यापिका सौ. के. जे. सिसोदिया यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी अमळनेर येथून बापूराव ठाकरे सामाजिक कार्यकते, पत्रकार अजय भामरे, रवींद्र मोरे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्रशासन अधिकारी जी. टी. टाक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
जी. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली..
आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख विकास महाजन सर यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button