sawada

सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तापी काठ परिसरात पुन्हा होत आहे चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ!

सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तापी काठ परिसरात पुन्हा होत आहे चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ!

“गहुखेडा येथे शेती उपयोगी ६ पाण्याच्या मोटारी फोडून चोरट्यांनी केली ताब्यांची तारे लंपास शेतकरी हवालदिल”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व रावेर तालुक्यात तापी काठ परिसर म्हणून प्रसिद्ध गहुखेडा शिवारातून दि.२ जुलै रोजी रात्री चोरट्यांनी तब्बल ६ शेती उपयोगी पाण्याच्या मोटारी फोडून कायद्याचा कोणतच धाक न बाळगता थेट त्या विज मोटारीतून ताब्यांच्या तारांची चोरी करून पुन्हा एका प्रकारे सावदा पोलिसांना चोरट्यांनी आवाहन दिले.या आधी सुद्धा अशा प्रकारे मोटारी चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत.तसेच आता गहुखेडा शिवारातून नदी काठी ठेवलेल्या सदाशिव सोमा चौधरी, युवराज चौधरी,उत्तम कोळी व विजय कोळी,रा.रणगांव यांच्या प्रत्येकी एक मोटर आणि खुशाल पाटील गहूखेडा, यांच्या दोन अशा एकूण ६ पाण्याच्या मोटारी फोडून त्यातून तांब्याच्या तारांची चोरी केल्याची घटना समोर आलेली आहे.तसेच शेत शिवरात व तापी काठ परिसरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंताजनक असून या प्रकरणी पोलिसांनी गस्त वाढवून लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या व आधीच आसमानी व सुलतानी संकटात सापडून आर्थिक रित्या अतिशय कमकुवत झालेल्या शेतकरी बांधव चोरट्यांच्या स्वरुपी निर्माण झालेल्या मानवनिर्मित संकटा पासून तरी निदान सुरक्षित व चिंतामुक्त राहीला पाहिजे.तसेच चोरट्यांवर देखील कायद्याचे वचक निर्माण व्हावे.तरी खाकी कडून या दिशेने ठोस पाऊल उचलले जावे अशी अपेक्षा त्रस्त शेतकरी व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button