‘ आर्टिकल १५ ‘ ने माझं काम काहीसं सोप्प केलं …..
पुणे अतिथी संपादकीय ( डॉ.संजय दाभाडे , पुणे , ९८२३५२९५०५
काल रात्री नवा हिंदी चित्रपट
‘ आर्टिकल १५ ‘ बघितला ….
आवडला मला काही मर्यादांसह….
एक चित्रपट काही समाजव्यवस्था बदलवू शकत नाही , समाज बदलण्यासाठी पिढयानपिढया
समाजाला संघर्ष करत नि वेदनेतून
पुढं सरकत राहावं लागतं ह्याची जाणीव आपल्याला असतेच.
पण अश्या चित्रपटातून दुर्लक्षित मुद्द्यांवर
काही संवाद , चर्चा घडण्याची काही स्पेस तयार होते व
तेदेखील महत्वाचे असते.
चित्रपटाला निघण्याआधी
मी माझ्या घरात दिमाखात उभे असलेले ‘ भारतीय संविधान ‘ माझा मुलगा आदिम च्या हातात दिले …… त्याला म्हटलं ,
” बाबारे , शोध तू स्वतःच ‘ आर्टिकल १५ ‘ संविधानात ….
तुझा बाप नि तुझ्या बापासारखे लाखो लोक माणूस म्हणून जगू लागलेत ते ह्या संविधानामुळे ….” ….!
पोरानं संविधान हातात घेतलं …..हाताळलं , आर्टिकल १५ शोधलं , वाचलं ….
पुन्हा पुन्हा वाचलं ….जे कळलं नाही ते माझ्याकडून समजून घेतलं …..
मग थिएटरात जाऊन
आम्ही बघितला ‘ आर्टिकल १५ ‘…..
चित्रपट बघतांना आदिम अस्वस्थ झाला होता ….
मध्येच माझा हात हातात घेत होता.समजून घेत होता प्रत्येक दृश्य मनपूर्वक ..
चित्रपटातलं एक भयानक दृश्य ….
मैला साफ करणारा सफाई कामगार ( मॅन्युअल स्कॅवेन्जर )
अत्यंत घाणीने भरलेल्या मॅनहोल मध्ये उतरतो…..
नखशिखांत त्या घाणीने माखतो …..
अंगावर शहारे आणणारं ते दृश्य बघितलं आदमने नि त्याने मला पुन्हा विचारलं ….पप्पा कोण असतात हि माणसं ….कसं करू शकतात ते एवढं भीषण काम ….?
मी म्हटलं , त्यांना कुठंय माणूसपण ….पण एवढं सत्य आहे कि असलं काम करतांना आपल्या देशात दर ५ दिवसांनी किमान १ कामगार मृत्त्यूमुखी पडतो …..एवढं स्टॅटिस्टिक्स देऊ शकतो आपला समाज फक्त ….बस्स्स…..
” सब बराबर हो गये तो राजा कौन बनेगा ……?
” सिस्टीम है , बनायी रखनी होगी ……”
ह्या शब्दांचा व त्यामागील विषमतावादी , वर्चस्ववादी
विचारांचा मतितार्थ त्याला कळत होता …..
गायब झालेल्या तिसऱ्या मुलीचे ‘ हरवली आहे ‘ ह्या पोस्टरवर जेव्हा धार्मिक पोस्टर चिपकवल्याचे दृश्य समोर आले तेव्हा हे पण कळलं मुलाला कि ‘ धार्मिक राष्ट्रवाद ‘ शोषित – वंचितांचे जगण्या – मरण्याचे
चित्रपटात भगव्या पेहरावातील महंत
‘ हिंदू दलित ‘ म्हणू लागला तेव्हा आदीमने मला विचारलं हि काय भानगड आहे ….?
मी म्हटलं , हि ह्यांची ‘ समरसता ‘ आहे …..वर्चस्व व
शोषण कायम ठेऊन मुसलमानांना दहशतीत ठेवण्यासाठी बहुसंख्यांकवादाचं संख्यात्मक पारडं मजबूत ठेवण्यासाठी ह्यांना ‘ हिंदू ‘ दलित हवे आहेत व आदिवासी ‘ वनवासी ‘ म्हणून हवे आहेत . मुसलमानांना चेपण्यासाठी
२००२ च्या नरसंहारात हिंदू दलित व ‘ वनवासी ‘ आदिवासी वापरलेत ह्यांनी .
ह्याला ‘ सावरकरवाद ‘ देखील म्हणतात असं मी म्हटलं .
चित्रपटाचा नायक त्याची
मैत्रीण अदितीला विचारतो –
” यु वॉन्ट हिरो …..( टू कम अँड रेस्क्यू द पीपल ….)
अदिती म्हणते , ” नो ….नो …आय डोन्ट वॉन्ट हिरो …..आय वॉन्ट द पीपल हू डोन्ट वेट फॉर द हिरो …..”
माझ्या क्लिनिक मध्ये चे गव्हेराचं पोस्टर आहे नि
त्यावर लिहिलंय , ” मी मुक्तिदाता नाही …..मुक्तिदाता नसतातच …..लोकच
लोकांना मुक्त करतात ……”
आदितीचं म्हणणं तेच होतं ……मी मुलाला ते सांगितलं .त्याला संविधानातील
‘ आर्टिकल १५ ‘
कळू लागलं …..तो अस्वस्थ होता…..
त्याची हि अस्वस्थता मला आश्वस्त करणारी आहे ….
इथल्या मनुवादी व्यवस्थेनं डॉ. पायल तडवीचा बळी घेतला ,परंतु त्या व्यवस्थेशी ‘ बिरसा – फुले – शाहू – आंबेडकरी ‘ विचारांची धगधगती मशाल हाती
घेऊन दोन हात करणारी पिढीही तयार होतेय हि खात्री पटली …..❗
“आर्टिकल १५ ” चित्रपटाने माझं काम थोडं सोप्प केलं हे ह्या चित्रपटाचं यश ……❗❗
♦डॉ.संजय दाभाडे ,
पुणे ….
९८२३५२९५०५ ,







