पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून इंदापूर नगरपरिषद व इंदापूर पोलीस स्टेशन यांच्यावतीने बाहेरगावाहून इंदापूर शहरात नागरिकांनी प्रवेश करू नये म्हणून नेमण्यात आलेल्या पुणे मार्गावरील डोंगराई सर्कल,बारामती रोड उड्डाणपूल,अकलूज रोड उड्डाणपूल व देशपांडे व्हेज येथील बायपास रोड नाकाबंदी टिम परिसराची पाहणी इंदापूर नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केली.
नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना हे काम करत असताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्यास सांगितले.आलेल्या प्रवाशी व गाडी मध्ये ठराविक अंतर ठेऊन चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. वारंवार हात स्वच्छ धुणे, तोंडास मास्क अथवा रुमाल वापर करणे आदी सुरक्षा पाळणे बाबत सूचना केल्या तसेच त्यांच्या कामाचे व सेवेचे कौतुक केले. अग्निशामक वाहनावरील कर्मचारी शहरात विविध ठिकाणी जंतुनाशके औषध फवारणी करीत आहेत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनाही आपली सुरक्षा काळजी घेण्याची विनंती केली.नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत नागरिकांनी शासकीय यंत्रणा व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.
नगराध्यक्षा अंकिता शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी संयमाची तसेच खबरदारीची ही वेळ असून प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले. नगरसेवक कैलास कदम हे देखील त्यांच्या प्रभागात औषध फवारणी करताना उपस्थित होते.यावेळी अशोक चिंचकर,अल्ताप पठाण उपस्थित होते.






