भुसावळ शहरातील छोट्या व्यावसायिकांची प्रांताधिकारी यांचे कडे दहा वाजे पर्यंत परवानगी द्यावी ही मागणी
खिर्डी खु प्रतिनिधी – भिमराव कोचुरे
भुसावळ शहरातील सर्व लहान दुकान व्यावसायिक उदा.पाणीपुरी, आइस्क्रीम विक्रेते,चायनीज ,भेल पुरी, पावभाजी मसाला डोसा व्यावसायिक व तत्सम दुकादारांना आपली दुकाने उघडण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशानुसार 7वाजे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.परंतु वरील पैकी बरेच व्यवसाय सायंकाळी 7वाजे नंतर ची वेळ ही व्यवसाय करण्यासाठी अनुकूल असते.ग्राहक सायंकाळी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी येत असतो. मा.जिल्हाधिकारी महोदय यांनी 7वाजे पर्यंत दिलेल्या मुदती मुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत.परिणामी खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी चा कच्चा माल वाया जात आहे.त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान लहान व्यावसायिकांना सहन करावे लागत आहे. यामुळे सर्व लहान व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून आमच्या सह आमच्या कडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्या व्यवसायाला संध्याकाळी 7वाजे नंतर ग्राहकांची नियमित गर्दी होत असते.परंतु जिल्हा प्रशासनाच्या धोरणा मुळे7वाजेला दुकाने बंद करावी लागत आहे.दुकाने बंद करण्यासाठी थोडा जरी उशीर झाला तर पोलिस प्रशासन लहान दुकादारांना 500/- रुपये पर्यंतचा दंड आकारत असल्याने आम्हाला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे सर्व लहान दुकानदारांना प्रचंड मनस्ताप होत आहे. निवेदनाच्या माध्यमातून आपणास नम्र निवेदन सादर करण्यात येते की प्रशासनाने ठरविलेली सायंकाळी 7वाजेच्या मुदतीत वाढ करून किमान शासन निर्णयानुसार पूर्वी प्रमाणे रात्री 10वाजे पर्यंत ची मुदत वाढ लहान दुकानदारांना देण्यात यावी.जेणे करून आमची उपासमार त्वरित थांबेल .आम्ही सर्व दुकानदार कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या फिजिकल डिस्टनसिंग सह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू याची शास्वती देत आहोत.आमची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.10 वाजे पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रांताधिकारी साहेब भुसावळ यांचे कडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व लहान व्यावसायिकांनी केली आहे.






