कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सावदा पोलिसांचा कारवाईचा बडगा ९ हजाराचा दंड वसूल
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा
सावदा पोलीस स्टेशन तर्फे बिना मास हेल्मेट वाहनधारकांवर कारवाई
विना मास्क १०,तर २० विना हेल्मेट वाहनधारकांचा ९ हजार दंड
कोरोना या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच लॉक डाऊन चा काटेकोर पालन व्हावायासह नागरिकांनी विनाकारण घराबाहेर व वाहनधारकांनी रस्त्यावर फिरू नये व विनाकारण घरा बाहेर पडणाऱ्यांना चपराक बसावी म्हणून पाच सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तब्बल ५० पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह मोठे वाघोदा .ता.रावेर.जि.जळगांव येथील बस स्थानकावरील महामार्गावर तसेच गावात विनाकारण मास्तर लावलेले नागरिक व विना हेल्मेट वाहनधारक यांना दंडाकार कार्यवाही करीत कारवाईचा बडगा उगारला सपोनि राहुल वाघ पिएसआय राजेंद्र पवार वाहतूक शाखेचे पोहेकॉ.सलिम तडवी ,पोकॉ.रुस्तम तडवी पोहेकॉ.रवी मोरे .शेख रिजवान.पाटील आदीसह ५० पोलिस कर्मचारी चां समावेश असलेल्या ताफ्यातील सावदा पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा मोठा वाघोदा वासियांनी तर्फे तसेच ग्रामपंचायतीसह महसूल प्रशासन आरोग्य विभाग व सर्वसाधारण नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.






