Nashik

व्हि एन नाईक महाविद्यालयाचे खतवड येथे रासेयो हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन

व्हि एन नाईक महाविद्यालयाचे खतवड येथे रासेयो हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी- सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि व्ही एन नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन तालूक्यातील खतवड येथे दिनांक ११ ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत करण्यात आले असून, बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी १० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य सुनिल उगले, रासेयो अधिकारी नाना चव्हाण, तेजस्विता मुंडे आणि डॉ. अरविंद केदारे यांनी दिली.
सदर शिबिराप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष ऍड पी. आर गीते, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस ऍड तानाजी जायभावे, सर्व विश्वस्थ , संचालक तसेच सरपंच बबन दोबाडे, उपसरपंच सुखदेव खुर्दळ,सदस्य व ग्रामस्थ आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button